यश मनोज नवले आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत सुवर्णपदक

Cityline Media
0
यश मनोज नवले आशियाई पाॅवर लिफ्टिंग चाम्पियनशिप २०२५ स्पर्धेत सुवर्णपदक

श्रीरामपूर (दिपक कदम)नुकत्याच झालेल्या आशियाई पाॅवरलिफ्टिंग चम्पियनशीप २०२५ स्पर्धेसाठी येथील यश मनोज नवले याची गुजरात येथे नुकतीच निवड झाली होती.त्या स्पर्धेत  यश नवले याने घवघवीत यश संपादन करुन गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक पटकाविले.
श्रीरामपूर येथील क्रीडा प्रशिक्षक माॅंटी साळवे अविनाश राऊत तसेच मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली २५० किलो वजन उचलण्याचे मार्गदर्शन त्याला लाभले.  प्रसिद्ध नॅशनल बॉडी बिल्डर तसेच मानाचा गणपती वर्ष ७५,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,आझाद मैदान श्रीरामपूर ,या मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले यांचे ते  चिरंजीव आहेत.यश नवले याने यापूर्वी देखील २०१३ मध्ये झालेल्या श्रीलंका येथे कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून विजेतेपद मिळविले होते. 

अमरावती येथील बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या विषयात त्याने डिग्री व पदवी मिळवली आहे.या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील ,राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते.अविनाशदादा आदिक,महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसीएनचे अध्यक्ष.सचिन टापरे,श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक , मंडळाच्या सांस्कृतिक प्रमुख जयश्री थोरात, अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंग अध्यक्ष.मनोज गायकवाड, प्रख्यात उद्योजक.आशिष बोरावके, माळी शुगर कारखान्याचे संचालक यश बोरावके,किशोर मल्टिप्लेक्स चे मालक कुणाल बोरावके ,मंडळाचे इंजि. सुनिल साठे,उद्योजक सुनिल साळुंके,सोमनाथ महाले, सुर्यकांत सगम, प्रविण गुलाटी,समीर आव्हाड, डॉ.विजय त्रिभुवन, प्रा. अनिल बागुल सर,सत्यजीत लबडे,विजय मुगदिया,किशोर फाजगे, प्रमोद पत्की आदिंनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!