नाशिक मध्ये संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

Cityline Media
0
नाशिक शहरातील मेन रोड येथे संत गाडगेबाबा पुतळ्याला परीट धोबी समाजाने केले अभिवादन 

नाशिक (दिनकर गायकवाड) राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १४९ वी जयंती नाशिक येथे सकाळी ११ वाजता नाशिक शहरातील मेन रोड येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा पूर्णाकृती पुतळा स्मारक स्थळावर साजरी करण्यात आली करण्यात आली असून यावेळी मोठ्या जनसमुदाय उपस्थित होता.
नाशिक शहर परीट- धोबी सेवा मंडळाच्या वतीने व समस्त समाज बांधवांच्या वतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मेनरोड येथील पुतळ्या जवळून  परिट -धोबी समाज बांधवांनी पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढली,या यात्रेत श्रीकुमार निलेश सगर व माऊली शिंदे यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करत शोभायात्रेचे आकर्षण वाढविले.यावेळी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार,सुधीर खैरनार,उत्सव समितीचे प्रमुख वसंत जाधव, शहराध्यक्ष संतोष निकम, नाशिक पूर्व महानगरपालिका विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित महिलांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन सादर केले. तसेच जयराम वाघ,विजय शिरसाठ,सुरेश गवळी,नाना गवळी,योगेश सगर,कैलास देवरे, दत्ता वाघ,प्रमोद बोरसे,निलेश सगर,सुभाष मोरे आदीच्या हस्ते आरती करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात यावेळी जोरदार जयजयकार करण्यात आला.
प्रसंगी शहर व जिल्ह्यातील परीट धोबी समाज बांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी जेष्ठ समाजबांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे राजेंद्र निकम,महेश गवळी,उल्हास लोंदे,राजेंद्र जाधव,रवी बोरसे, बापु ईशी,भगवान वाघ,दगु राऊत, अशोक बस्ते, राहुल रंधे, प्रसाद सोनवने, गणेश निकम, विजय रंधे, सागर निकम आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.मिष्टान्न  वाटप करून यावेळी जयंती सोहळ्याचा समारोप झाला.
🔸छायाचित्र ओळी : नशिक शहरातील मेन रोडवरील संत गाडगे महाराज पूर्णाकृती पुतळा स्मारक स्थळावर  संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना नाशिक शहरातील परीट - धोबी समाज बांधव, दुसऱ्या छायाचित्रात संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करून दाखल झालेले हिरावाडी येथील  शाळकरी विद्यार्थी श्रीकुमार निलेश सगर व माऊली शिंदे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!