वरवंडीत शिवमय जल्लोषात शिवजयंती साजरी.

Cityline Media
0
वरवंडीतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात 

वरवंडी(संपत भोसले) संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी या ठिकाणी भव्य शिवजयंती महोत्सव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संयुक्त स्वरूपात पार पडले.
स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बस्ते हे होते कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून लाभलेले साकुर क्षेत्र शिक्षण विस्तारअधिकारी कल्याण राऊत,वरवंडी केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक भोसले,यावेळी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. 
कार्यक्रमाचे वेगळेपण  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती गावातील महिला यांच्या हस्ते पार पडली यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक रोहिदास गागरे ,कैलास बबन वर्पे,बापूसाहेब सोपान वर्पे, उपसरपंच पौर्णिमा नवनाथ भोसले,शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कविता संपत भोसले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे,प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काकासाहेब देवराम तळेकर, तुळशीराम पाटोळे,वरवंडी च्या महिला बचत गटाच्या स्थापलिंग ग्राम संघाच्या सामुहिक संसदन व्यक्ती कविता भारत भोसले, साकुर गटाच्या महिला बचत गटाच्या दीपिका ज्योती विलास वर्पे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते .यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे  स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी शाळेतील विकास वर्पे,सुवर्णा गायकवाड या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी स्थापलिंग तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने शाळेचे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व समस्त ग्रामस्थ वरवंडी यांच्या वतीने गावातील नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!