सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथानपणामुळे बिरेवाडी फाटा ते साकूर रस्त्याचा खेळ खंडोबा-राहुल ढेंबरे

Cityline Media
0
साकूर (प्नतिनिधी)संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बिरेवाडी फाटा ते साकूर रस्त्याचा खेळ खंडोबा झालेला आहे,निधी उपलब्धता असलेला हा रस्ता रस्ता अजूनही प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथानपणामुळे ही परिस्थिती ओढवली असा आरोप येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात श्री.ढेबरे यांनी म्हटले आहे की मांडवे बुद्रुक-टाकळी ढोकेश्वर रस्ता परिसरातील जीवघेणे खड्डे,मुळानदी पुलाचे डांबरीकरण आणि आराखडा खराब झाला आहे ते केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथानपणा आणि दुर्लक्षामुळे.

कित्येक वर्षांपासून खड्डेमय असणाऱ्या बिरेवाडी फाटा ते साकुर रस्त्यासाठी जवळपास आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपुर्वी निधी उपलब्धता होऊन देखील अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही रणखांब फाटा ते वरवंडी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असुन त्यापैकीच जवळपास दोन कि.मी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभाग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रलंबित आहे.त्यामुळे दळवळणासाठी अडथळा निर्माण होत आहे.तसेच उर्वरित रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे.साकुर ते वरवंडी फाटा रस्त्याचे काम झाले पण संपुर्ण साईड पट्टी तसेच संपूर्ण पूर्णत्वाचे काम मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा रस्ता म्हणजेच साकुर-टाकळी ढोकेश्वर रस्ता.या रस्त्याला मांडवे बुद्रुक (संगमनेर)-मांडवे खुर्द (पारनेर) मुळा नदीच्या पुलानजीक संगमनेर हद्दीतील जीवघेणे खड्डे, नदीच्या पुलावरील डांबरीकरण आणि आराखडा खराब झाला असून तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे अध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर/पारनेर तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की साकुर टाकळी ढोकेश्वर रोड, सदर रस्त्याला मुळानदी पुलानजीक संगमनेर/पारनेर सा.बां.विभाग हद्दीत जीवघेणे खड्डे पडलेले असून 
अगदी पुलानजीक मांडवे बुll दिशेला रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे असुन प्रवाशांच्या हितासाठी ती तोडण्यात यावीत. तसेच मोठ्या प्रमाणात जिवघेणे खड्डे पडलेले असुन पुलानजीक सुरू असलेले कॉक्रीटचे काम अतिशय अरुंद आणि नवीन झालेल्या कामाला देखील खड्डे पडलेले आहेत.या ठिकाणाहून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.साईड पट्टी तसेच साईड गटारचे काम व्हावे.

मुळा नदी पुलावरील डांबरीचा थर पूर्णपणे उध्वस्त झालेला असून पुलाच्या मुळ स्ट्रक्टरचे स्टील देखील उघडे पडलेले पडलेले असून सदर गोष्टीचा विचार करता हे खड्डे व पुलावरील डांबरीकरण तात्काळ पूर्ण करावे,एखादी दुर्दैवी घटना घडण्याअगोदर ही दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय तसेच 
आमदार अमोल खताळ,
पारनेरचे.आमदार. काशिनाथ दाते माजी आमदार.बाळासाहेब थोरात खासदार.निलेश लंके,
(खासदार,यांना देखील देण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!