हिवरगाव पावसा (नितीनचंद्र भालेराव) शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची मुदत नुकतीच संपली असून अखेरचा पर्याय म्हणून पुन्हा येथील तलाठी कार्यालयातर्फे ई-पीक पाहणीची सुरवात झाली आहे. शंभर टक्के पीक पाहणी(DCS) नोंदणीसाठी येथील सहाय्यक चंद्रकांत भालेराव मेहनत घेत आहेत.
१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा,हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून,शेतकरी स्तरावरील नोंदणीची मुदत नुकताच संपल्यानंतर पुन्हा येथील तलाठी कार्यालयातर्फे लॉगीन वरून येथे ई-पीक पाहणी डीसीएस मोबाइलद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत लॉगिन वरून चालू आहे.ई-पीक पाहणी यंदाच्या रब्बी हंगामापासून ई-पीक पाहणी नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच (डीसीएस) मोबाइल ॲपच्या माध्यमातून शेतकरी व सहायक स्तरावरून पिकांची नोंद केली जात आहे.
यात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊनच मोबाइल ॲपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करून माहिती भरावी लागत आहे.सध्या शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी मुदत संपली आहे.उर्वरित खातेदारांची ई-पीक पाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिनने पूर्ण करण्याचे काम सर्वत्र चालू आहे.त्यानुसार हिवरगाव पावसा येथे ई-पीक पाहणी शंभर टक्के पीक पाहणी नोंदणीसाठी सहाय्यक चंद्रकांत भालेराव हे मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत.सहाय्यक भालेराव हे येथील सर्व शेतकऱ्यांशी संपर्क साधून गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल ॲपच्या माध्यमातून पिकांचे फोटो घेऊन शंभर टक्के नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.कोणताही शेतकरी या पाहणीतून वंचित राहू नये असा उद्देश येथील तलाठी कार्यालयाने ठेवला आहे.
गाव नमुना १२ वर होणार नोंद शेतकरी स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या पीक नोंदी पैकी १०० टक्के पडताळणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे. सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे.त्यानंतर ई-पीक पाहणी गाव नमुना १२ वर प्रतिबिंबित करण्यात येणार आहे.
२८फेब्रुवारी पर्यंत तलाठी लॉगिन वरून ई-पीक पाहणी करता येईल.त्यामुळे उर्वरित खातेदारांनी ई-पीकपाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिन वरून पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन हिवरगाव पावसा गावातील शेतकऱ्यांना कामगार तलाठी पूनम वैदकर व सरपंच सुभाष गडाख यांनी केले आहे.