चणेगाव पंचक्रोशीतील प्नचंड समुदाय अंत्यविधीस उपस्थित
संगमनेर (प्नतिनिधी) तालुक्यातील
चणेगाव येथील शैक्षणिक कामात नेहमी अग्रेसर असणारे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रदीर्घकाळ सेवा दिलेले शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक ते माजी शिक्षण विस्ताराधिकारी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य रभाजी गुलाब माळी (वय ७६) यांचे काल अचानक हृदयविकाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.येथील शिक्षक अशोक रभाजी माळी संपत रभाजी माळी शिक्षक दिलीप रभाजी माळी यांचे ते वडील होत.त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी १० जानेवारीला चणेगाव येथे होईल.सिटीलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
