श्रीरामपूर(प्रतिनिधी) तालुक्यातील एका विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणांविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नुकताच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन चार दिवस झाले तरी आरोपी अद्याप मोकाट असुन तो उथळ माथ्याने फिरत आहे.
तालुक्यातील कारेगाव येथील प्रकाश बाळासाहेब बारसे (वय २० ) येथील हा आरोपी पिढीत मुलगी २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या बंधू सोबत शाळेत जात होती.यावेळी प्रकाश हा आपल्या काही मित्रांसोबत तेथे आला.येथीलच एका दुकानासमोर तिला अडवून म्हणाला माझे व तुझ्या बहिणीचे प्रेमसंबंध आहेत.तु मध्ये का? येते.असे म्हणून तिच्या गालावरुन हात फिरवला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला त्यानंतर तिने वडिलांसमवेत तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदविली.
या आधी या आरोपीने २६ जानेवारी रोजी देखील तिला खडे मारून त्रास दिला होता.त्यावेळी गावातील काही व्यक्तींनी त्याला समज देऊन सोडले होते.त्यानंतरही त्याची छेड काढण्यापर्यंत मजल गेली.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहे.हा आरोपी सापडत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.