आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा कलागुणदर्शन सोहळा
संगमनेर प्रतिनिधी( नितीनचंद्र भालेराव)
तालुक्यातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संगमनेर तालुक्याचे आ.अमोल खताळ यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.तसेच संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर,गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड,हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे, सारोळे पठार परिक्षेत्राचे विस्तार अधिकारी यशवंत भांगरे,केंद्रप्रमुख चंदनापुरी बाळासाहेब जाधव,
पोलीस पाटील मथाजी पावसे, प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक भाऊराव राहिंज,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे,प्राथमिक शिक्षक बँकेच्या
संचालिका श्रीमती सरस्वती घुले-सहाणे,विविध कार्यकारी सेवा सोसायटी अध्यक्ष बाबासाहेब पावसे,प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त संजय शेडगे,देवगड खांडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणपत पावसे,प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या विश्वस्त मीना गाढवे - शिंदे,जय मल्हार दूध उत्पादक संस्थाचे अध्यक्ष डॉ.संदीप पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अध्ययन,संस्कार व कलाविष्कार या त्रिवेणी संगमातून शालेय जीवन फुलते.विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण स्नेहसंमेलनामध्येच विकसित होत असतात. सांज चिमणपाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रमांमध्ये लावणी,नृत्य,आदिवासी नृत्य, भारूड,कोळीनृत्य,रेकॉर्ड डान्स, नाटिका,राष्ट्रभक्तीपर गीत यासारख्या विविधतेने नटलेल्या उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात येणार आहे.स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी, सामाजिक,संस्कृती धार्मिक संघटना, तरुण मित्र मंडळ, पालक व ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुरेश नगरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा यांनी केले आहे.
