झरेकाठी (सोमनाथ डोळे) संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे जनसेवा फाउंडेशन मार्फत प्रेरणा महिला बचत गट झरेकाठी फूड प्रोसेसिंग युनिट स्टॉल उद्घाटन अध्यक्ष सौ.शालिनी विखे पा. यांच्या हस्ते पार पडले
प्रसंगी, ॲड पोपट वाणी,ॲड सुनंदा वाणी,मंगल वाणी, कामगार पोलीस पाटील सुदाम वाणी, ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड, महेश नाईकवाडी, पत्रकार सोमनाथ डोळे,प्रेरणा महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ. शितल डोळे ,सचिव मंदा शिंदे ,व सदस्य वनिता वाणी, कांता वाणी, सुनिता वाणी, लता गायके,अनिता डोळे, अनिता प्रधान, जयश्री प्रधान,उपस्थित होते.
लोणी येथील जनसेवा फाउंडेशन,प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे,विशाल घोलप यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे
जनसेवा फाउंडेशन मार्फत महिला सबलीकरणाला मोठ्या प्रमाणात मदत होत असते, महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण हे देऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या मार्गदर्शन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनी विखे पा. यांच्याकडून मिळेल.झरेकाठी येथे जनसेवा फाउंडेशन मार्फत १९ महिला बचत गट निर्माण झालेले असून जनसेवा फाउंडेशन मार्फत महिलांना रोजगार करून देण्याच्या हेतूने १९ महिला गटांना पिठाची गिरण वाटप करण्यात आले बचत गटाच्या या चळवळीमुळे महिलांचा सन्मान वाढला आहे त्यातुन झरेकाठीत महिला गटाचे मोठे संघटन निर्माण झाले आहे.
यावेळी प्रेरणा बचत गटाच्या अध्यक्षा शितल डोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
