वनकुटे मधील तोतया विरुद्ध गुन्हा दाखल
साकूर (प्नतिनिधी) माझे आणि फायनान्सवाल्यांचे चांगले संबंध आहे त्या बदल्यात आपण ट्रॅक्टर घेऊ तो तुझ्या नावावर घे फायनान्स आपण दोघे भरु अशी बतावणी करून संगमनेर तालुक्यातील साकूर येथील एका व्यक्तीची त्याच्या मित्रानेच फसवणूक करून ट्रॅक्टर लांबविला आणि फायनान्सचा बोजा मात्र मित्राच्या डोक्यावर चढविल्याने फायनान्स कर्त्या मित्राने घारगाव पोलिस ठाण्यात तोतया मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील साकूर येथील किशोर विश्वनाथ बनसोडे (वय ४०) हे मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात अशावेळी एक दिवस मित्रांच्या मित्रा करवी पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील आदेश दगडू केदारी (वय..२८) याची ओळख झाली मग पुढे ओळखीचे रूपांतर व्यवहारात झाले.त्यात एक दिवस दि. २५ डिसें.२०२४ रोजी महिंद्रा कंपनीचा ५७५ सरपंच ट्रॅक्टर त्यांनी एकत्रित खरेदी केला मात्र त्याचे फायनान्स साकूर येथील किशोर विश्वनाथ बनसोडे यांच्या नावावर चढविले.
पुढे अचानक व्यवहारात खटके उडाले मग त्या तोतया मित्राने किशोर बनसोडे यांच्या घरुन ट्रॅक्टर पळविला वरुन किशोर बनसोडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली.आणि म्हणाला मी तुला ट्रॅक्टर देणार नाही,मी फायनान्स देखील भरणार नाही तुला काय करायचे ते कर,तु जर माझ्या नादी लागला तर मी तुला जिवंत सोडणार नाही आणि यावेळी किशोर बनसोडे यांना मारहाण केली.
याबाबत घारगाव पोलीसांनी आरोपी आदेश दगडू केदारी वय २८ विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एस एस २०२३ ११५(२) भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ ३५२ भारतीय न्याय संहिता २०२३ बी एन एस २०२३ ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हा तोतया सराईत चोर आहे आता पर्यंत असे अनेक ट्रॅक्टर त्याने पळविले असल्याची नागरिक दबक्या आवाजात चर्चा करतात.फिर्यादी किशोर विश्वनाथ बनसोडे यांना धमकीचे फोन येत असून आपल्या जिवीतास सदर आरोपी कडून धोका आहे असे किशोर बनसोडे यांनी म्हटले आहे.
