श्रीरामपूर (दिपक कदम) येथील जामे मशिदमधे मा.आमदार लहू कानडे यांचे वतीने मुस्लिम बांधवांना पविञ रमजान महिन्याच्या निमित्ताने इप्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
प्रसंगी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतांना लहू कानडे म्हणाले की, रमजानचा पविञ महिना हा इस्लाम धर्मातील श्रेष्ठ महिना असुन मानवतेचा संदेश देणारा आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे करतात,त्यामुळे शरीराबरोबरच मनाचीही शुध्दता होते.
उपाशीपोटी जीवन जगणाऱ्या माणसाच्या अवस्थेची जाणीव होते,त्यामुळे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मंहमद पैंगबर यांनी कुराण या पविञ ग्रंथात मानवी मूल्य जपण्याचा तसेच समाजातील गरीब पीडीत, असहय, गरजू लोंकाना मदत करण्याचा उपदेश केलेला आहे,
त्यामुळे मुस्लिम बांधव रमजान महिन्यामधे इस्लाम धर्मातील तत्वाचे आचारण करतात व गोरगरीब गरजू लोंकाना मदत करुन मानवता वाद समाजामधे रुजवित आहे, यानिमित्ताने मा. आ. लहू कानडे यांनी सर्व मुस्लीम बांधवांना पविञ रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या, तसेच यानिमित्ताने सर्व जाती धर्मात जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता राहावी व पविञ रमजान महिन्यात रोजे करुन रोजदरानी केलेली प्रार्थना व त्यांचे इच्छिलेले अल्लाहाने कबूल करावे अशी प्रार्थना करुन शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास उपस्थित अशोक नाना कानडे,अरुण पाटील नाईक,सतीश बोर्डे,, विष्णुपंत खंडागळे,देवा कोकणे, नानासाहेब रेवाळे,चांगदेव देवरॉय, नगरसेवक प्रकाश ढोकणे,राजेंद्र कोकणे,कार्लस साठे,दिलीप अभंग,रमेश आप्पा आव्हाड,निलेश भालेराव,अक्षय पाटील नाईक, प्रतीक कांबळे, आशिष शिंदे,हरिभाऊ बनसोडे, मधुकर ठोंबरे, सतीश कार्ले, दिलीप अभंग, यूनूस शेख, दिपक कदम,भैय्या शाह,जमीर शेख,मदन हाडके, विनायक मोहन, सम्राट माळवदे,शब्बीर पटेल, प्रताप पटारे, संजय घोडे, राहूल अभंग, जाधव, काशीनाथ गायकवाड, वेणूनाथ डुक्रे, मारुती शिंदे,
भाऊसाहेब डुक्रे, सागर मुठे, शिवाजी पवार,संदीप खरात, नितीन बोरुडे, मुख्तार शाह, जामा मशीदचे मौलाना ईमदाद अली,सर्व धर्मगुरु हाफिस मुखतार, साजिद मिर्झा, शफी शाह,बिलाल शाह, मुसा पठाण, मैनुददीन काझी,अल्ताफ बागवान, रहिम, रहीम शेख, बिलाल शाह, सलीम खलील शाह, रियाज पठाण, सुभेदार सय्यद, गफार कासम शाह, महेबूब उमर अली, समीर बागवान, अनिल इंगळे, कलीम कुरेशी, रशिद कुरेशी, अन्वर कुरेशी, तनवीर मलिक, आसिफ जहागीरदार, असीफ पठाण, शकील कुरेशी, ॲड.मोबीन शेख, तनवीर शाह,आबु कुरेशी, मोहसिन शेख, अमन शेख व इतर सर्व समाजबांधव बहुसंखेने उपस्थीत होते.
