मा.म.देशमुखांच्या सुनबाई मयुरा देशमुख यांनी झटकली मानसिक गुलामी,कुणबी घरातील देव्हाऱ्यातील ब्राह्मणी देवांची हकालपट्टी लय कठीण! आणि देव्हार्यात बुध्द ठेवणं तर त्याहून कठिण!
मा. कांशीरामांनी चालवलेल्या चळवळीत सहभागी झालेल्या कुणब्यांचा केवळ 'इन्टलेक्चुअल' माहोल नाही बदलला,तर घरातले देव्हारे पण बदलले!अमरावतीच्या मयुरा देशमुख यांच्या घरातला देव्हारा बघा.( ह्या आहेत मा.म. देशमुखांच्या सुनबाई. खरं तर हे सांगायची पण आवश्यकता नाही कारण त्या नंतर मराठा सेवा संघाच्या/ जिजाऊ ब्रिगेड माहोलात घडल्या.पण प्रभाव आणि प्रेरणा मा.म. देशमुखांच्याच राहिल्या.घरातल्या महिला मंडळाच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आडून सांस्कृतिक गुलामी घरातून हद्दपार न करणारे अनेक पुरोगामी दिसतात.पण घरात एक आणि बाहेर एक असा तडजोडवाद मा.मं.नी केला नाही. नातेगोते अटळ बाब. पण प्रबोधनापासून पळ काढून चालत नाही.हा मामंचा जीवनादर्श अनुसरण्यासारखा आहे. त्या मामंचं ऋण आठवणीने नमूद करतात.)
'मराठा सेवा संघ, संभाजी / जिजाऊ ब्रिगेड मधल्या स्त्रीयांना काय स्वतंत्र अस्तित्व आहे?' त्या तर अजूनही सरंजामी निगरानी- नियंत्रणातच राहून काय ते सुधारणावादी बोलतात'!...या उथळ शेरेबाजी, कुजबुजीचा प्रतिवाद फिल्डवर्कशिवाय करता येणार नाही, तुम्ही बाहेर कितीही परिवर्तनवादी असा,कितीही फुले आंबेडकरांचा जप करा, पण खरं चित्र तुमच्या घरातला देव्हारा सांगेल.
आज देव्हारे बाजूला करण्यापेक्षा देव्हाऱ्यातील प्रेरणादर्श काय? हा कळीचा प्रश्न आहे. आणि घरातली बाई तुम्हाला सहजासहजी आपल्या या सुप्त वर्चस्वाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू देत नसते.तुम्ही आतबाहेर किती बदलला? कुटूंबात परिवर्तनाची 'बला' आणली की नाही ? हे तुमचे देव्हारे सांगतील.
जिजाऊ बिग्रेडला स्त्रीमुक्ती चळवळ तशी अजून फार मोजत नाही पण कधी तरी दखल घ्यावी लागेल एवढं कौटुंबिक/सामाजिक जीवन ढवळून निघालंय कुणबी- मराठा समूहाचं.
धम्मसंगिनी रमागोरख
