श्रीरामपूर( दीपक कदम) येथील सॅन्जो कॉन्व्हेंट नर्सरी स्कूल मध्ये नुकतेच वार्षिक संमेलन उत्साहात गुण्यागोविंदाने पार पडले.
प्रसंगी लहान बालक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य करून सर्वांचे मन जिंकले.यावेळी सोबतच बक्षीस वितरण करण्यात आले.त्याप्रसंगी डि पॉल पब्लिक स्कूलचे मॅनेजर फादर सिजो व व्यवस्थापक फादर फ्रॅन्को आणि मुख्याध्यापक सिंलिन सिस्टर कृपामारीया आणि सिस्टर ग्लोरिया यांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.वर्गशिक्षिका सौ.स्वीटी चालीसेरी आणि सहाय्यक कर्मचारी कमल सोजवळ यांनी या स्नेहसंमेलनासाठी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी नेहा चालीसेरी,निया कुथूर,दिया कुथूर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास गणेश पवार, सुनिल बोरगे संतोष दिवे सचिन अमोलिक दिपक कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.