अहिल्यानगर (दिपक कदम) अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील नांदगाव शिंगवे येथे काल झालेल्या भीषण अपघात केडगाव येथील एका महिलेच्या हातावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या घटनास्थळी गर्दी झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेस पाचारण केले सदर महिलेस अहिल्यानगर येथे उपचार्थ हलविले.
सविस्तर वृत्त असे की केडगाव येथील दिपक बापू शिंदे आणि त्यांच्या सासु सौ.सविता अर्जुन शिंदे हे दोघेही दुचाकीवरून दुचाकी क्र.एम.एच.१६ डी.ए.६४४७ श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या ठिकाणी लग्न समारंभासाठी जात असताना नांदगाव शिंगवे जवळ त्यांच्या दुचाकीला अहिल्यानगर कडून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्र. एच.आर.५५ ए.पी.३४०३ हि ओव्हर टेक जोराचा धक्का लागल्याने सौ.सविता शिंदे या ट्रकच्या चाकाखाली रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या उजव्या हातावरून गेल्यानं त्यांना इजा झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.अशावेळी ग्रामस्थानी रुग्णवाहिकेस पाचारण केले अपघाताची माहिती मिळताच राहुरी येथील रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली.आणि पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले.यावेळी नांदगाव शिंगवे ग्रामस्थांनी या घटना प्रसंगी घाव घेऊन मदत केल्याचे दिसून आले.