-अत्याचार विरोधी कृती समितीचे अधिक्षकांना निवेदन
-तक्रारदार अज्ञान मुलीची जबानी नोंदवुन पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी
नाशिक (दिनकर गायकवाड) नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले आरोपी उजळ माथ्याने फिरत असुन त्यांनी दहशत माजविली आहे.येथील पोलिस ठाण्यात गु. र. नं. १०५/२०२५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा व इतर न्याय्य मागण्यांचे निवेदन येथील अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने नाशिक ग्रामिणचे पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन नुकतेच देण्यात आले.
पोलिस अधिक्षकांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतली व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदगाव तालुका तसेच स्थानिक पोलिस ठाण्यास दुरध्वनी वरून या गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेशित केले.यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक ॲड.राहुल विष्णू तुपलोंढे, रोहिणी जाधव (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर संचालिका नाशिक), पिडीतेची आई सिमा निकाळे, सामाजिक कार्यकर्ती वंदना ऊन्हवणे, रोहित साळवे,किशोर चोपडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
