मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तर्फे,नाशिक महानगर पालिकाचे आत्तिरिक्त आयुक्त,स्मिता विजया गंगाधर झगडे यांना निवेदन सादर.
नाशिक : (दिनकर गायकवाड) मुस्लिम समाचा रमजान ईद सण असल्याने ईदगाह ( गोलक्लाब मैदान) येथील अतिक्रमण काढून साफसफाई पाण्याची यवस्था करण्याबाबत व नागरी सुविधा पुरवण्याकामी येथील मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तर्फे नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, स्मिता झगडे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष अजीज पठाण.जिल्हा अध्यक्ष चांद मुस्त्ताक शेख शाम गायकवाड सलिम खान व पदाधिकारी यांच्या समावेत रमजान ईद संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
३०,३१ मार्च २०२५ रोजी मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा पवित्र सण रमजान ईद असल्याने ,त्या दिवशी नाशिक महानगर क्षेत्रातील सर्व मुस्लिम समाजातील व्यक्ती नमाज पठणासाठी ईदगाह ( गोल्फकलॅब मैदान) येथे मोठ्या संख्येने एकत्र येत असतात.सद्या नाशिक महानगराची मुस्लिम लोकसंख्या पाहता अस्तित्वात असलेली जागा अपुरी पडत आहे.त्यामुळे रस्त्यावर नमाज पडावे लागते.नाशिक महानगर पालिकेने पाण्याची टाकी ,बांधत असताना तेथे असलेले राजदूत हॉटेलच्या भिंतीस लागून असलेल्या अतिक्रमित झोपड्यामुळे सदरची जागा कमी झालेली आहे.
ईदगाह मैदान येथे अतिक्रमित झोपड्या ताबडतोब हटविण्यात याव्यात.त्याचप्रमाणे मैदानावर पडलेल्या खड्यांची डागडुजी सपाटीकरण साफसफाई पाण्याची व्यवस्था अशा अनेक मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे.अशा मागणीचे निवेदने यापूर्वीही अनेकदा देण्यात आले आहेत,परंतु यावर आज पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.यावेळी शअशी मागणी अजीज पठाण, चांद मुस्त्ताक शेख शाम गायकवाड, मुक्तार शेख दानिश शेख सलिम खान दिनकर गायकवाड नूर सैयद यांनी निवेदनावर सह्या करून केली आहे.
