-टोल प्रशासनाने बॅरिकेट,संरक्षक कठडे,प्रवासी थांबा शेड आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी
-म.फुले,डॉ.आंबेडकर,राजश्री शाहू विचार मंच व ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव)
संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा गावच्या फाट्यावर धोकादायक वळण आहे. हिवरगाव फाट्यावर सर्विस रोड लगत धोकादायक वळणावर ट्रक ड्रायव्हर साकुर येथे गाडी घेऊन जात असताना रस्ता सोडून खाली गेला परंतु चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली.
हिवरगाव फाट्यावर वळणावर एका बाजूला खोल खड्डा आहे.सदर ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहे. परंतु टोल प्रशासनाने येथे संरक्षक कठडे बॅरिकेट बसविणे अत्यंत आवश्यक आहेपरंतु एखादी दुर्घटना झाल्याशिवाय त्यांना जाग येईल का?असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहे.
टोल प्रशासनाने तातडीने येथे बॅरिकेट आणि संरक्षक कठडे न बसविल्यास तसेच हिवरगाव फाटावर प्रवासी थांबा शेड न बसविल्यास,चुकून गावातून जाणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करणे,उड्डाणपुलाखाली सतत फुटणारे चेंबरचे झाकण इतर आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून न दिल्यास म.फुले,डॉ.आंबेडकर,
राजश्री शाहू विचार मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिवरगाव फाट्यावर असलेले धोकादायक वळण व दुसऱ्या बाजूला खोल खड्डा त्यामुळे अनेक छोट्या मोठे अपघात होतात.नुकतेच येथे हिवरगाव पावसा ते साकुर येथे जाणारा ट्रक खोल खड्ड्यात जाता जाता वाचला.चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी हानी टळली.हिवरगाव फाट्यावर सर्विस रोड लगत कमानी जवळ रस्त्याला धोकादायक वळण आहे व दुसऱ्या बाजूला खोल खड्डा आहे.त्या खड्ड्यातून ग्रामिण पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गेलेली आहे.सदर ठिकाणी टोल प्रशासनाने टोल प्रशासनाने बॅरिकेट,संरक्षक कठडे तात्काळ बसवणे गरजेचे आहे.येथे पुन्हा जर काही अनुचित प्रकार घडला अपघात घटना घडला त्या सर्वस्वी टोल प्रशासन महाराष्ट्र शासन जबाबदार राहील.
हिवरगाव पावसा लगात टोल प्लाझाची मोठी इमारत उभी आहे.त्यासाठी हिवरगाव पावसा गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेत जमिनीचे हस्तांतरण केले गेले,परंतु गावातील नागरिकांना प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधे प्रवासी शेड बांधलेले नाही.प्रवाशांना विद्यार्थ्यांना बसची अथवा गाडीची भर उन्हात वाट पाहत थांबावे लागते.रणरणत्या उन्हात तिरिफ लागुन चक्कर येऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ प्रवासी थांबा शेड हिवरगाव फाटा येथे उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.
टोल चुकून गावातून बरदाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा.हिवरगाव फाटा आरखडी रोड मार्गे ते हॉटेल मयूर एक्सप्रेस दरम्यान टोल चुकवून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. भरधाव वेगाने टोल चुकवून जाणाऱ्या वाहनांमुळे अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी टोल व्यवस्थापन व प्रशासकिय यंत्रणा जबाबदार असेल.तसेच हिवरगाव फाट्यावरील उड्डाणपूला खाली नालीवरचा चेंबर नेहमी गाड्यांच्या ये जा करण्यामुळे फुटतो आणि त्यातील लोखंडी गज बाहेरून आलेल्या अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते.त्यामुळे सदर ठिकाणी भक्कम असे सिमेंट काँक्रेटचे झाकण बसवावे.
सदरच्या मागण्यांबाबत टोल तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अहिल्यानगर व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांनी टोल व्यवस्थापनास व कंपनीला द्यावेत अशी मागणी महात्मा फुले,डॉ. आंबेडकर,राजश्री शाहू विचार मंच अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव, यांच्या सह भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,देवगड वृक्ष मित्र गणपत पावसे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,बाळासाहेब भालेराव, बच्चन भालेराव,मन्सूर इनामदार, भीमा पावसे,दीपक भालेराव, राजेश भालेराव,विकास दरोळे, सोमनाथ दवंगे,संजय भालेराव,
महेंद्र भालेराव,सुयोग भालेराव, संतोष भालेराव, संजय भालेराव, गौतम भालेराव,मुकेश भालेराव,लहानु भालेराव,समधान भालेराव,मच्छिंद्र गडाख आणि हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित मागण्यांवर टोल प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास ग्रामस्थ व वरील संघटनांमार्फत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
