चला येताय ना!अहो कुठे काय? कल्याणला..!

Cityline Media
0
३० मार्चला कल्याण मध्ये भिमाचा किल्ला संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन.
मुंबई (ऋतुजा अहिरे )आज ३० मार्च २०२५ ना, कल्याण मध्ये संगीतमय कार्यक्रम आहे.विसरले की काय? ....सारी बाबांची लेकरे सामाजिक ऐक्य भावनेतून एकत्र येत आहेत.हा निव्वळ चॅरिटी शो नाही तर आपली गीत गायनातून प्रबोधनाची संस्कृती जपण्याची संधी आहे आणि ही संधी आज संध्याकाळी के सी गांधी स्कुल ऑडिटोरियम, डी -मार्ट समोर, बैल बाजार कल्याण पश्चिम येथे चॅरिटी शो च्या अंतर्गत आयोजित केली आहे.
स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे आणि लय मजबूत भिमाचा किल्ला फेम गायक पुण्याचे येवले ब्रदर्स यांचा हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवरील  गीत गायनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आहे.ज्याला आम्ही भिम ऑर्केस्ट्रा म्हणतो.

या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून येणारा निधी, खर्च काढून जो उरणार आहे.तो डी.एम.सी.टी वृद्धाश्रमाच्या ॲम्ब्युलन्ससाठी आणि अनाथ मुले महिला वृद्ध यांच्या मदतीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. म्हणजे एका बाजूला मनोरंजन आणि दुसऱ्या बाजूला पुण्याची संचिती किंवा धम्मदान!
चला तर या वेळात वेळ काढून एका छान संगीतमय भिम गीतांचा आस्वाद लुटण्यासाठी प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन संयोजकांनी केले आहे 

संपर्क-डॉ.रवींद्र जाधव डॉ. सुरेखा जाधव ,  ऋतुजा आहिरे आणि संपूर्ण आयोजन समिती
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!