गल्ली बोळातील राष्ट्रीय तडजोड संघटनेच्या अध्यक्षांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट..!

Cityline Media
0
हा बॅनर लावणारी मंडळी ही डॉक्टर ,नर्सेस आहेत. त्यांनी भारतातील अत्यंत कठीण असणारी नीट,NEET परीक्षा पास केली आहे.ही परीक्षा दर वर्षी किमान अठरा लाख ते वीस लाख विद्यार्थी देतात त्यांना मागे टाकत ही मंडळी डॉक्टर आणि नर्स झाली.यांच्याकडे चांगले पद आणि चांगला पगार पण आहे.पण त्या बॅनरवर स्वतःचे फोटो लावले नाहीत.
 महामानवाची हिमालयाची उंची यांना कळते.आपण त्याच्या चरणाची धूळ देखील नाही याचे भान असावे म्हणून स्वतःचे फोटो छापून आणले नसतील काय? 
   नाही म्हटलं,काही स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष ,संस्थापक अध्यक्ष ,गल्लीबोळातील दल बदलू नेते ,करंगळीच्या बोटावरील तिळाएवढे काम करणारे मंडळी ,आपल्या फोटोने तर महामानवाला व इतर महापुरुषांना अक्षरशः घेरून घेतात.काही बॅनरवर महामानवाचा/महापुरुषांचा फोटो छोटा आणि यांचे फोटो मोठे असतात.गल्ली बोळातील राष्ट्रीय तडजोड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी यातून धडा घ्यावा..!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!