संगमनेर (किशोर वाघमारे) राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील किरण राजेंद्र पलगडमल यांनी नुकतीच पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये यश संपादन केल्यामुळे सात्रळ परिसरासह राहुरी राहता संगमनेर तालुक्यात त्यांचे कौतुक आणि अभिनंदन आहे.
किरण पलगडमल हा अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून त्यांनी गरिबीतून शिक्षण घेत आहे.आई शिलाई मशीनचे काम करत असून वडील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रबोधन करत गावोगावी व्याख्यान देतात.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबीयासह नागरिक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.युवा नेते अहमदनगर मा.खासदार डॉ.सुजय विखे पा. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनी विखे पा.शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे राजन ब्राह्मणे रमेश पलगडमल सागर पलघडमल बाबासाहेब खरात अमोल कदम दिपक वाघमारे विशाल बनसोडे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळवे सुनील चोखर विजय चोखर सुनील संसारे आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहे.
