मुंबई (प्नतिनिधी) मुंबईतील मुलुंड शहरात 'महाबोधी विहार मुक्ती'साठी सर्व पक्षीय बौध्द समाज बांधवांनी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती मुलुंड विभाग संघर्ष समितीच्या वतीने शांती मोर्चाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सदरचा मोर्चा भीमसेन बुद्ध विहार डम्पिंग रोड मुलुंड पश्चिम ते मुलुंड तहसील कार्यालय येथे आयोजितकरण्यात आला होता. बुद्धगया येथील ब्राह्मण समाजाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली.
बुद्धगया येथील ब्राह्मण समाजाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या अशी मागणी पुढे येत आहे.
बिहार राज्यातील पाटना बुद्धगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले इतर धर्मीयांचे व्यवस्थापन आहे. महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या,यासाठी देशभर भन्तेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत.
आज मुलुंड येथे देखील महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच,बौध्द समाज बांधवांनी मोठा मोर्चा काढून महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले.
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती मुलुंड विभाग संघर्ष समितीच्या वतीने शांती मोर्चा काढून भन्तेजी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.मुलुंड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.सदर मोर्च्यात हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते.सदरचा मोर्चा शांततेत पार पडला.
