निमगाव टेंभी येथील विशाल कदम या तरुणाची गावरान कोंबडी पालनातून प्रगतीकडे वाटचाल
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरच्या निमगाव टेंभी येथील विशाल बाबासाहेब कदम या तरुणाने सोयाबीन,भाजीपाला शेतीला पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधला.त्यात १५० ते २०० गावरान कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली असून महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळते.
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याजवळ निमगाव टेंभी हे गाव आहे.कांदे,वांगे,सोयाबीन, मका हे या भागातील मुख्य पीक.येथील बाबासाहेब आत्माराम कदम यांना वडिलोपार्जित शेती कमी आहे.त्यात ते पारंपरिक सोयाबीन-तूर, गहू,बाजरी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिके घेत असत.
अल्पभूधारक असले तरी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत उभे करून आपली शेती अधिकाधिक नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न त्यांचा सतत सुरू असतो.गावरान कुक्कुटपालन कदम कुटुंब अनेक वर्षांपासून परसबागेत गावरान कोंबड्यांचे पालन करीत आहेत.तीन वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा विशाल बाबासाहेब कदम जवळच्या नातेवाईक क मित्रांच्या माहितीतून कोंबडीपालन व त्याचे फायदे,अर्थकारण समजले.गावरान कोंबड्याची २० अंडी आणून व्यवसाय सुरू झाला.कोंबड्यांची पैदास सुरू झाली.आज त्यांच्या कुक्कुटपालनाचा प्रमुख जोर गावरान कोंबडीवरच आहे.वीस कोंबड्यांच्या आज दोनशे कोंबड्या झाल्या आहेत. शंभर छोटी पिल्ले आहेत, ६० ते ७० तलगी ५० ते ६० अंडे देणाऱ्या कोंबड्या २० कोंबडे दोनशे ते अडीशे कोंबड्या मिळून त्याहून अधिक संख्या आहे.महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळते ताजा पैसा छोट्याशा कुक्कुटपालनातूनही पैसा खेळता राहू शकतो हे कदम यांच्या निसर्ग पोल्ट्री फार्म ला भेट दिल्यानंतर दिसून येते.त्यांना या व्यवसायात महिनाकाठी आठ ते दहा हजार रुपये व काही वेळा त्याहून अधिक रक्कम मिळवण्याची संधी प्राप्त होते. जागेवरच मिळते उत्पन्न विशेष म्हणजे विशाल कदम यांना विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही.दररोज सुमारे ५० ते ६० अंड्यांचा खप होतो.ग्राहक घरी येऊन अंडी वा कोंबड्या घेऊन जातात. आपणही त्यांना ९३७३१५४६१० या नंबरवर फोन करुन त्यांच्या निसर्ग गावरान पोल्ट्रीस भेट देऊ शकता.
कोंबडीचे अंडे नगाला अंडे १० रुपयांना विकले जाते. गावरान जातीला मागणी व दरही चांगला असल्याने जास्त फायदा होतो.
देखभाल खर्च कमी संगमनेर शहरापासून १० किलोमीटरवरच यांचे कदम यांच्या निसर्ग पोल्ट्री फार्म आहे. त्यातच उपलब्ध स्रोतांचा वापर कोंबडीपालनात केला आहे. कुठलाही अधिकचा खर्च केला नाही. कोंबड्यांसाठी साध्या पद्धतीची शेड मुक्त संचार पद्धतीच्या शेड साठी लाकडांचा वापर झाडांचा आधार घेऊन साधी कोंबड जाळे लावलेली त्यांना पाण्याची सोय, खाद्य, कंपनी खाद्याबरोबर घरगुती गहू, बाजरी,बारीक कोंबड्यांना बाजरी भरडून दिली जाते. वेळेवर लसीकरण केले जाते.५ दिवशी १४ दिवशी २१ दिवशी लसीकरण केले जाते.त्यामुळे या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे आरोग्य निरोगी राहते.अशाप्रकारे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनातून आर्थिक प्रगती साधनाऱ्या तरुणाचा प्रयत्न इतर शेतकरी बंधू व युवकांनी युवकांसाठी आदर्श ठरेल.
