यात्रा नियोजन समितीच्या प्रशासकीय सुचना
कळवण(प्नतिनिधी) उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील चैत्रोत्सव २०२५ येथे जाणाऱ्या पायी दिंडी/पालखी/समिती मंडळ यांना आँनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे यात्रा नियोजन समितीच्या प्रशासकीय सुचनेद्वारे नुकतेच जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.
आद्यस्वयंभू श्री.क्षेत्र सप्तशृंगगड येथे लाखोंच्या संख्येने पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी / पालखी /यात्रा आदी संबंधीत विविध समिती मंडळांना श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधा, प्रशासकीय नियंत्रण तसेच आपत्ती
व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे, भाविकांच्या गर्दीचे नियोजन,संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रीये संबंधीत निर्धारीत पुर्तता करुन उत्सव कालावधीत भाविक भक्तांना सुलभ व सुरक्षित नियोजन होणे कामी
नाशिक जिल्हा प्रशासनाने विश्वस्त संस्था,श्रीक्षेत्र सप्तशृंगगड ग्रामपंचायत व नांदुरी ग्रामपंचायत यांसह जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग यांच्या सहभागातून आयोजीत केलेले यात्रा नियोजन सभेत ठरले प्रमाणे गुगल फॉर्म प्रकारात ऑनलाईन नोंदणी कार्यान्वित केलेली असून,सर्व दिंडी / पालखी / यात्रा समिती / मंडळा अंतर्गत येणाऱ्या भाविक भक्तांचे प्रातिनिधीक स्वरुपात अत्यावश्यक व अद्यावत तपशिल उपलब्ध करुन त्यांच्या सेवा-सुविधा अनुषंगीक योग्य तो समन्वय पुर्तता होणे कामी चैत्रोत्सव २०२५ दरम्यान सर्व पायी प्रकारात येणाऱ्या पायी दिंडी पालखी समिती / मंडळ यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
सदरची नोंदणी व प्रक्रिया ही प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेली असून,भविष्यकाळात अधिक प्रभावीपणे पायी येणाऱ्या भाविक भक्तांना (दिंडी पालखी यात्रा आदी) यांना श्रीक्षेत्र येथे अत्यावश्यक सुलभ दर्शन तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधा तसेच प्रवासा दरम्यान जिल्हावार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महाराष्ट्र शासना मार्फत विशेष सेवा-सुविधा कार्यान्वित करणे कामी उपयुक्त ठरणार आहे. पर्यायी विश्वस्त संस्था व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी पालखी यात्रा आदी संबंधीत विविध समिती / मंडळांना विनंती करण्यात येते की, त्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfRXLeh605mv7Cjd3bzJv-em1vwtqBo3uij9S4kk8ZDe2suxw/viewform या ऑनलाईन लिंकवर (गुगल फॉर्म) आपल्या नियोजीत दिंडी / पालखी / यात्रा आदी संबंधीत समिती / मंडळांची नोंदणी करुन चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील यात्रा नियोजन समिती व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिकेला योग्य ते सहकार्य देवू करावे असे आवाहन जिल्हा पोलीस, महसूल,स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विश्वस्त संस्थेचे करण्यात आले असल्याचे तपशील विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन आनंदराव दहातोंडे यांनी माध्यमांना सांगितले.
