सिद्ध कपिलेश्वर विद्यालयाचे गेट टुगेदर उत्साहात
सिन्नर (दिनकर गायकवाड) तालुक्यातील खबांळे येथील सिद्ध कपिलेश्वर माध्यमिक विद्यालय १९९७ ते २००० पर्यंत एकत्र शिकलेल्या माजी विद्यार्थी रोप्य स्नेहसंमेलनासाठी नुकतेच या शाळेत एकत्र जमले होते
प्रसंगी अनेक आजी-माजी शिक्षकांच्या उपस्थित हे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक दिनकर दंडगव्हाण होते.यावेळी ब्रम्हानंद न्यु इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस.जी.सोनवणे होते, मधुकर भोर,संजय आव्हाड सुनिल बाविस्कर नंदिनी काजळे यांच्यासह माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते
सकाळी दहा वाजेपासून अनेक जण उपस्थित होते.सलग साडेतीन तास या दीर्घ वेळेत हा कार्यक्रम सुरू होता.या सर्व शिक्षक विद्यार्थी लक्षणीय संख्येने उपस्थित होते.कौलाघात घडणाऱ्या स्थित्यंतरामुळे अनेकांना गहिवरून आले.
अतिशय भावनिक वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्यात पाच वाजले तरी शाळा सुटूच नये असे प्रत्येकाला वाटत होते.असा मेळावा पुन्हा होणे नाही अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात एकनाथ खाडे यांनी श्रद्धांजली,मौन प्रस्ताव मांडत त्यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचा परिचय करून दिला.अध्यक्ष निवड अनुमोदन प्रतिमा पूजन सुचना रामनाथ आंधळे यांनी मांडली यावेळी सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्री.सोनवणे सरांचा सत्कार मनोहर आंधळे यांनी केला श्री.बोडखे सरांचा सत्कार सुरेखा आंधळे यांनी केला श्री.सानप सरांचा सत्कार विजय गायकवाड यांनी केला श्री दंडगव्हाण सरांचा म्हाळू खाडे यांनी केला शिक्षिका श्रीमती कांबळे यांचा सत्कार आशा खाडे यांनी केला श्री आव्हाड सरांचा सत्कार बाळू दौंड यांनी केला श्री. बाविस्कर सरांचा सत्कार म्हाळू आंधळे यांनी केला श्री.भोर सरांचा सत्कार गोपीचंद गोसावी यांनी केला शिक्षिका नंदिनी काजळे यांनी पुन्हा एकदा हजेरी पत्रक वाचले.
यावेळी उत्तम आंधळे भगवान सांगळे बबलू दंडगव्हाण मंगल आंधळे आशा खाडे दत्तू गोसावी मनोहर आंधळे यांनी मनोगते व्यक्त केली स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
