धार्मिक जाणिवांच नष्ट झाल्या तर मानसिक गुलामी निखळून पडेल.

Cityline Media
0
एका अमेरिकी पत्रकाराने एका भारतीय ब्राम्हणाला विचारलं.
  पत्रकार : जगामध्ये जिथे जिथे शोषण होते,तिथे शोषितांकडून नेहमी क्रांती केली गेली आहे.तुम्ही ब्राह्मण लोक भारतातील ८५% लोकांवर हजारो वर्षे झाली अन्याय करत आला आहात आणि आजही करताय. तरीही हे लोक उठाव का करत नाहीत?
ब्राम्हण : ही लोकं मुलं जन्माला घालू शकतात पण; त्यांचं नाव आम्हाला विचारल्या शिवाय ठेवू शकत नाहीत. ही लोकं घरं बांधू शकतात; पण आमच्या परवानगी शिवाय घरात पाय ठेवत नाहीत.ही लोकं लग्न करू शकतात पण; आम्हाला विचारल्या शिवाय तारीख व मुहर्त सुध्दा काढू शकत नाहीत. ही लोकं कुठलाही व्यवसाय करू शकतात; पण आमच्या शिवाय शुभमुहूर्त काढू शकत नाहीत. जी लोकं आपल्या जीवनातील कुठलेही निर्णय स्वतःची स्वतः घेऊ शकत नाहीत, ज्यांना चांगलं काय, वाईट काय काही कळत नाही, श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याचा विचार करत नाहीत. आजही ज्या लोकांचा आपल्या आईबापांपेक्षा जास्त विश्वास देव देवतावर आणि ब्राह्मणांवर असतो, जी लोकं कुत्रा, मांजर, जनावर, करणी, झाडझुडपं, विधवा यांना अशुभ मानतात, जी लोकं रिॲलिटी विज्ञानापासून दूर पळतात, मजबूरीला नशीब मानतात, आजाराला देवाचा कोप मानतात, ती लोकं काय क्रांती करणार? आपल्या उपाशी भावाला किंवा खऱ्या गरजवंताला ते मदत करत नाहीतं; पण मंदिरात चांगुलपणा दाखवायला हजारो, लाखो रुपये देतील. ज्यांच्या दिवसाची सुरुवात अंधश्रद्धेशिवाय होत नाही ते वैचारिक गुलाम कधीच क्रांती करणार नाहीत.* जोपर्यंत आम्ही त्यांना देव, धर्म, जात, रूढी-परंपरा खोटे संस्कार, कुंडली यामध्ये अडकून ठेवले आहे तोपर्यंत आम्ही त्यांचे मालकच आहोत.!

जोपर्यंत धार्मिक जाणिवांच नष्ट होत नाही मानसिक गुलामी निखळून पडणार नाही आणि ब्राम्हणी सत्ता अबाधित राहणार आणि क्रांती ही फक्त पुस्तकात राहणार..

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!