अहिल्यानगर (दिपक कदम) डिव्हाईन आश्रम आणि केडगाव ताबोर आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बायबल कन्व्हेन्शन महाप्रार्थनासभा येथील लिंक रोड, केडगाव याठिकाणी नुकतीच उत्साहात पार पडली
महाप्रार्थनासभाचे आयोजन ताबोर आश्रमाचे धर्मगुरू रे.फा.डीबीन, रे.फा.जोशफ, रे.फा.जोमील, रे.फा.फ्रॅको यांनी मोठ्या भक्तिभावाने दिनांक १४ मार्च शुक्रवार ते १६ मार्च शनिवार या कालावधीत पार पडला.त्यामध्ये त्यांना विशेष रे.फा.सजाॅय व ब्रदर प्रसाद यांनी मोलाची साथ दिली.
याप्रसंगी धर्मगुरूनी सर्व ख्रिस्ती भाविकांसाठी तसेच सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि विशेष करून जे आजारी आहेत त्यासाठी त्यांना परमेश्वराने त्यांच्या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते.
चाळीस दिवसांच्या उपवास म्हणजे ग्रुड फ्रायडे पर्यंत प्रार्थना सभा ताबोर आश्रम येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.याठिकाणी श्रीरामपूर व हरेगाव येथील ख्रिस्ती भाविकांनी सहभागी झाले होते.शेवटी परमेश्वराची आराधना घेऊन महाप्रार्थनासभेची सांगता झाली.
