गरिबांच्या संसाराशी निगडित असलेल्या योजना पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन-सुधाकर रोहम
संगमनेर (किशोर वाघमारे) महायुती सरकारने जाहीरनामा प्रमाणे शेती कर्जमाफी आनंदाचा शिधा माझी बहीण लाडकी रुपये २१०० शिवभोजन थाळी आदी महत्त्वाच्या गरीब माणसाच्या संसाराची निगडित असणारे योजना बंद केल्याने नागरिक वर्गामध्ये महायुती सरकारच्या विरोधात अत्यंत नाराजी पसरली आहे.या त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करु असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी दिला आहे.
शासनाने या योजना फक्त पुढे मतदान होते या दृष्टिकोनातून परत सरकार सत्तेवर आणण्यासाठी गरीब माणसाला एक प्रकारचे दाखवलेले आमिष दाखविले होते.निवडणूक संपली सत्ता मिळाली पण योजना बंद त्यामुळे सरकार प्रती जनसामान्यांच्या मनात रोष निर्माण होत आहे.
शासनाने या योजना त्वरित सुरू कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी प्रसिद्धिपत्रकान्वे दिला आहे रोहम यांनी पत्रकात पुढे सांगितले आहे की महायुती सरकारच्या सर्व योजना या फसव्या योजना असून फक्त सरकार सत्तेवर येण्याकरिता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये घोषणा केल्या असून ज्या योजनेमध्ये शेतकरी गरीब माणूस विधवा महिला यांचे प्रकरण मंजूर आहेत व विविध लाभाच्या योजना मंजूर आहेत त्यांना आता जाणून-बुजून त्रास देऊन अपात्र करण्याचे धोरण सध्या शासनाचे सुरू आहे.
सध्याचे महायुती सरकार हे तीन पक्षाचे असल्याने यामध्ये तिघांमध्ये समन्वय नसल्याने फक्त भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे जाणून-बुजून हे सामान्य माणसाची करत आहे हे सरकार केवळ शिवसेना शिंदे गटामुळे व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यामुळे आले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये या सर्व योजना सामान्य माणसाच्या संस्थांचे निगडित असल्याने लोकांच्या मनात असलेले काम केले परंतु राजकीय कुरबोडीमध्ये भाजपच्या जास्त जागा आल्याने भाजपाचे मुख्यमंत्री झाल्याने नको ते निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे.
३१ मार्च पूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरसकट कर्जमाफीची घोषणा सरकार करणार होते परंतु अर्थसंकल्पात या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पूर्ण पाणी पुसले असल्याने शेतकरी वर्ग या सरकारवर पूर्णपणे नाराज असून येत्या २० तारखेपर्यंत सरकारने तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी कारण मार्च महिना असल्याने बँकेने शेतकऱ्याला कर्ज साठी त्रास देण्याचे काम सुरू केले आहे
काही शेतकऱ्यांचे जमिनीचे निलाव होण्याचे वेळ आली आहे त्यामुळे शासनाने जर कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्याला पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल तसेच शासनाने दुधाला सुद्धा अनुदान तात्काळ दिले पाहिजे अन्यथा दुधाला ४० ते ५० रुपये भाव शासनाने हमीभाव जाहीर केला पाहिजे असेही सुधाकर रोहम यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे
शासनाने तात्काळ कर्जमाफी परिवारांना सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.निवेदनावर जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव संगमनेर तालुकाप्रमुख बाळासाहेब मोकळ जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड संघटक जनार्दन गायकवाड संपर्क प्रमुख बन्सी घंगाळे,जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळवे अशोक शिंदे बाळासाहेब पाळंदे जॉन पाळंदे राहता तालुकाप्रमुख श्रीरामपूर तालुकाप्रमुख रवींद्र हरार राहुरी तालुका प्रमुख सुनील चोखर पारनेर तालुकाप्रमुख राहुल घंगाळे आदींच्या सह्या आहेत येत्या २० तारखेपर्यंत शासनाने वरील योजना सुरू न केल्यास व कर्जमाफी न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व भव्य दिव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुधाकर रोहम यांनी दिला आहे.
