आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रा.गजानन बाबुराव कदम यांचे निधन

Cityline Media
0
संगमनेर ( प्नतिनिधी) येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते,ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी शिक्षक प्रा.गजानन बाबुराव कदम (वय ८१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे येथील लेखापरीक्षक अमोल गजानन कदम आणि अतुल गजानन कदम यांचे ते वडील होत.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे ते माजी अध्यक्ष होते.तसेच बहुजन समाज पार्टीचे ‌ते केडरबेस कार्यकर्ते होते मुळचे प्रिंप्री लोकई अजमपूर येथील रहिवासी असलेले जी.बी.कदम संगमनेरतील महात्मा फुले नगर येथे स्थायिक झाले होते.

तालुक्यातील चळवळीतील अनेक सामाजिक राजकीय कार्यक्रमात सक्रीय असत.त्यांच्या निधनाने संगमनेरच्या चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही.त्यांच्या अंत्यविधीस समाजातील शासकीय,सामाजिक राजकीय,शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रसंगी सर्वांनी आपल्या भाषणातुन त्यांना श्रद्धांजली दिली.सिटिलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!