रुग्णाच्या मदतीसाठी आपले अर्कचित्र काढून घ्या

Cityline Media
0
श्रीरामपूर पत्रकार संघ,
रंगलहरी आर्ट ॲकॅडमीचे आवाहन
श्रीरामपूर (प्नतिनिधी) पुण्यातील केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या येथील योगेश वांढेकर या तरूणाच्या मदतीसाठी श्रीरामपूर पत्रकार संघ व रंगलहरी आर्ट ॲकॅडमी यांच्या वतीने रविवार दि. ९ रोजी स. १० ते सायं. ६ पर्यंत ‘रंगरेषा मदतीच्या’ हा उपक्रम होणार आहे.
येथील मुख्य रस्त्यावरील आझाद मैदानासमोर चित्रकार भरतकुमार उदावंत व व्यंगचित्रकार रवी भागवत यांच्याकडून जास्तीत जास्त कलारसिकांनी आपले अर्कचित्र काढून घ्यावेत,असे आवाहन श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर यांनी केले आहे. 

योगेश वांढेकर हा ३२ वर्षीय तरूण अल्सर या आजाराने त्रस्त आहे.सध्या केईएम रूग्णालयाच्यात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.उपचारासाठी सुमारे ५ लाख रूपये अपेक्षित आहे.योगेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची असून समाजातील विविध स्तरातील दानशूर व्यक्तींना या उपचारासाठी आवाहन करण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून येथील सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेल्या श्रीरामपूर पत्रकार संघ व रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.रविवारी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.चित्रकार उदावंत व भागवत दिवसभर कलारसिकांची अर्कचित्रे त्यांच्यासमोरच साकारणार आहेत. त्याबदल्यात कलारसिक १०० रूपयांपेक्षा अधिक कितीही रक्कम देऊ शकतात. याउपक्रमातून येणारी सर्व रक्कम योगेशच्या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे.
आपण केलेली जास्तीत जास्त मदत योगेशच्या उपचारासाठी आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त कलारसिकांनी या उपक्रमाणत सहभागी होऊन आपली अर्कचित्रे काढून घ्यावीत, असे आवाहन श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष गाडेकर, सचिव प्रकाश कुलथे, सहसचिव महेश माळवे, उपाध्यक्ष करण नवले, विकास अंत्रे, खजिनदार अनिल पांडे व सर्व सदस्यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!