श्रीरामपूर(दिपक कदम)- श्रीरामपुरात सर्वांगिण विकसित असलेला प्रभाग म्हणून माजी नगरसेविका स्नेहल खोरेंच्या प्रभागाचा नावलौकीक झाला असल्याचे कौतुकास्पद विधान ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांनी थत्ते मैदान येथील चार सोलर हायमास्ट कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
यावेळी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, डेली वर्क आऊट ग्रूपचे सुशील पांडे, उद्योजक प्रकाश चुग, नंदिनी मुळे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मनोज आगे म्हणाले की, १९९५ नंतरच्या काळात थत्ते मैदानावर भूखंड हडपणाऱ्या बिल्डर टोळीचा डोळा होता.
एकमेव उरलेले मैदान बिल्डर लॉबीच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही पूर्ण ताकद लावली होती.स्नेहल खोरे नगरसेविका झाल्यानंतर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा.डॉ.सुजय विखेंच्या पाठबळाच्या जोरावर केतन खोरेंनी पुढाकार घेत मैदानावर लाल मातीचा जॉगिंग ट्रॅक उभारला, सुशोभीकरण केले.
त्यासोबत सोलर हायमास्ट बसविल्याने कायमस्वरुपी ही विजेची समस्या सुटणार असल्याचे प्रतिपादन आगे यांनी केले. तर केतन खोरे यांनी प्रास्ताविकात विखे पिता-पुत्रांचे आभार मानत आजवर केलेल्या कामांची माहिती दिली.विकासकामात राजकारण न करता आपला प्रभाग शहरात विकासाचे मॉडेल बनत असल्याची माहिती दिली.
चार सोलर हायमास्ट बसविल्यानंतर थत्ते मैदान परिसरात वीज नसली तरी कायमचा उजेड राहणार आहे. त्यामुळे पहाटे व रात्री फिरायला येणाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागणार नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खोरेंचे आभार मानले. यावेळी मोहन चुग, राजेश मुथा, सीमा पटारे, संजय काळे, अमित गांधी, अशोक सातुरे, रत्नेश मुथा, सुधीर धालपे, राजेश चोपडा, निखिल पवार, उमेश सूर्यवंशी, कुणाल दहिटे यांच्यासह डेली वर्क आऊट ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
