शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Cityline Media
0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुखांच्या  नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या असून शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्कत्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी नितीन भाऊ अवताडे यांच्या हस्ते शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर  केली असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षातून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना अनुसूचित जाती विभागामध्ये पदाधिकाऱ्याने प्रवेश केला.

 त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे सेलचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वाघमारे भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अंतोन भोसले यांनी शिवसेना अनुसूचित जाती विभागामध्ये प्रवेश केला असून वरिष्ठांची चर्चा करून लवकरच या तिनही प्रमुख पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी व उत्तर महाराष्ट्र राज्य कार्यकारणी त्यांची निवड करणारा असल्याची जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी माहिती दिली आहे.

अजूनही जिल्ह्यामधील बरेचसे पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे लवकरच शिवसेना अनुसूचित जाती विभागाचा मोठा मेळावा घेऊन पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रदेश अध्यक्ष प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे व अंतर्गत बॉडी जिल्हा प्रमुख आदींच्या उपस्थितीत भव्य मेळावा शिर्डी लोकसभा मतदारसंघात आयोजित करणार असून यामध्ये जिल्ह्यातील बरेचसे पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे यावेळी जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी फादर बॉडी जिल्हाप्रमुख कमलाकर  कोते व नितीन अवताडे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका प्रमुखांच्या नियुक्त जाहीर केल्या.

 पुढीलप्रमाणे अकोले तालुकाप्रमुख जयवंत आढाव संगमनेर तालुकाप्रमुख गौतम सिताराम रोहम राहाता तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे कोपरगाव तालुकाप्रमुख सिद्धार्थ  मेहेरखांब श्रीरामपूर तालुकाप्रमुख पप्पू उर्फ प्रताप पवार नेवासा तालुका प्रमुख अंजा बापू जाधव राहुरी तालुका प्रमुख सुनील धोंडीराम चोखर आदी प्रमुख तालुकाप्रमुखांच्या नियुक्त जाहीर केल्या असून यापुढील काळामध्ये वरील तालुकाप्रमुखांनी पक्षाच्वाया नियमात राहून पक्ष वाढीसाठी व सदस्य नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख म नामदार एकनाथ शिंदे  यांचे विचार तळागाळातील सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 यापुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले यावेळी नितीन अवताडे जिल्हाप्रमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या होणाऱ्या सर्व बैठकीला आपली उपस्थिती दाखवत पक्षाचे ध्येय धोरण जाणून घेऊन या पुढील काळामध्ये पक्ष बळकटीसाठी काम करत  नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण या पुढील काळामध्ये नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीनिशी लढणार असून ज्या पदाधिकाऱ्याच्या उमेदवारीसाठी विचार होईल त्या पदाधिकाऱ्यांची मात्र त्या भागात ताकद पाहिजे व पक्षाचे नाव उज्वल केलं पाहिजे असे आवाहन करत नितीन अवतडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांना विनंती करत शिवसेना अनुसूचित जाती सेलच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या तालुक्यांमध्ये फादर बॉडीने विश्वासात घेत मागत वर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी पाठिंबा देत विकास कामांना चालना देत नवनवीन योजना राबवण्यात व गाव तेथे संविधान भवन माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बांधवावे व त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके अभ्यासिका असे महत्त्वाचे विषय पक्षाच्या माध्यमातून सादर करावे.

 यापुढील काळामध्ये शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात व गणामध्ये पक्ष मेळावे घेतले जातील व त्यामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी व एकनाथ शिंदे यांच्या योजना नागरिकांसाठी कशा उपयुक्त आहे या पक्षाच्या माध्यमातून सांगितले जातील त्यावेळी सदर कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकारी अंतोन भोसले गौतम रोहम सिद्धार्थ मेहरखांब बाबासाहेब दिवे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सिद्धार्थ भाऊ मेहरखाब यांची शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समितीमध्ये राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना भाविकाऱ्याला शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे आयोजन राहता तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे यांनी केले होते तर आभार प्रदर्शन शिर्डी शहर अध्यक्ष उत्तम त्रिभुवन यांनी मांडले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!