श्रीरामपूर (दिपक कदम) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जयंती निमित्ताने येथील संशोधन कार्यालयात माजी आमदार लहू कानडे यांनी अभिवादन केले.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्य प्रभारी,सामाजिक, न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी माजी आमदार लहू कानडे यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्व व कार्य कर्तृत्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, शिवाजी गागुर्डे, बापूसाहेब लबडे, निलेश भालेराव, दिपक कदम,नानासाहेब रेवाळे,रमेश आप्पा आव्हाड, शब्बीर पटेल, सचिन जगताप, सतीश बोर्डे, सुदाम मोरे, दिपक निंबाळकर, सागर मुठे, शामराव मुठे, जमीर शेख, अक्षय अरुण पा. नाईक,भैय्या शाह यादी उपस्थित होते.
