हिवरगाव पावसा जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Cityline Media
0


-निलम खताळ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शन सोहळ्यास उस्पुर्त प्रतिसाद

-महंत एकनाथ महाराज पावसे यांनी जि.प.शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दिली अकरा हजार रुपयांची देणगी 

संगमनेर प्रतिनिधी/ नितीनचंद्र भालेराव 
संगमनेर तालुक्यातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.सायंकाळी ७.३० वाजता संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले
सदर कार्यक्रमास महंत एकनाथ महाराज पावसे,सरपंच 
सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,केंद्रप्रमुख चंदनापुरी बाळासाहेब जाधव,पोलीस पाटील मथाजी पावसे,प्राथमिक शिक्षक बँकचे संचालक भाऊराव राहिंज,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे,
प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका श्रीमती सरस्वती घुले-सहाणे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन बाबासाहेब पावसे,देवगड खांडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणपत पावसे,जय मल्हार दूध उत्पादक संस्थाचे अध्यक्ष डॉ.संदीप पावसे,
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थितीत होते.

 निलम खताळ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण स्नेहसंमेलनामध्येच विकसित होत असतात.सांज चिमणपाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या  उत्कृष्ट कार्यक्रमांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना गाणे,नृत्य शिकविणाऱ्या शिक्षकांचे तसेच अभिनंदन केले.जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांसाठी आवश्यक ते सहकार्य आमदार अमोल खताळ यांच्यामार्फत करण्याचे आश्वासन दिले.तसेच हिवरगाव पावसा येतील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी आमदार अमोल खताळ यांच्या आमदार निधितून दहा लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती दिली.तर महंत एकनाथ महाराज पावसे यांनी जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचा कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सदरच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अकरा हजार रुपये देणगी दिली.

सांज चिमणपाखरांची या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य,पोवाडे,आदिवासी नृत्य,कोळीनृत्य,रेकॉर्ड डान्स,नाटिका,राष्ट्रभक्तीपर गीत यासारख्या विविधतेने नटलेल्या उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण केले.सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश नगरे,शिक्षक राजेश नवले,रंजना नगरे,हरीभाऊ सहाणे,कला मार्गदर्शक सोनाली पावसे,निवेदक तथा मुख्याध्यापक जि.प.शाळा करंजकर वस्ती किरण शिरोळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पावसे व सर्व सदस्य,शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा यांनी प्रयत्न केले.

स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी,सामाजिक,संस्कृती,धार्मिक संघटना,तरुण मित्र मंडळ, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!