स्वच्छता अभियानात अनेकांनी नोंदविला सहभाग
संगमनेर (प्रतिनिधी) येथील
कृषी उत्पन्न बाजार समित्या स्वच्छ आवार अभियानांतर्गत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता अभियानामध्ये बाजार समितीचे सभापती, उपसभापती,संचालक,सचिव, अधिकारी,कर्मचारी,व्यापारी, हमाल,माथाडी कामगार यांनी आपला सहभाग नोंदवला.सदर स्वच्छता अभियान बाजार समितीच्या संपूर्ण आवारात राबविण्यात आले.यावेळी मार्केटमधील सर्व गाळाधारक, व्यापारी,आडते यांनी आपल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी डस्टबिनची व्यवस्था करुन सदन कचऱ्याची व्यवस्थित रित्या विल्हेवाट लावावी,असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी केले.तसेच यापुढे देखील बाजार समितीमध्ये कचऱ्याचा ढीग ज्याच्या दुकानापुढे आढळेल,त्या दुकानदारावर कडक कारवाई करुन दंड वसुल केला जाईल,अशी माहिती बाजान समितीचे सचिव सतिष गुंजाळ यांनी दिली.
यावेळी बाजार समितीचे संचालक मनसुख भंडारी,सतिष खताळ, सचिन कर्पे,दिपार्ल वर्षे, रुक्मिनी साकुरे यांच्यासह सर्व हमाल,माथाडी कर्मचारी, अधिकारी आदी उपस्थित होते.