श्रीरामपूर (दिपक कदम) येथील डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सिस्टर सेलीन यांनीही महिला दिनाची माहिती सांगितली.त्याचबरोबर आज महाविद्यालयातील 'शिस्तप्रिय वर्ग' याचे पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्वाती घोरपडे व सूत्रसंचालन सौ.प्रतीक्षा साळवे यांनी केले.इयत्ता पहिली अ वर्गशिक्षिका सौ.नंदा पवार. इयत्ता सहावी अ वर्गशिक्षिका सौ.माॅली कुथूर.इयत्ता सातवी अ वर्ग शिक्षिका सौ.माधुरी महाडिक यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी.रवींद्र लोंढे,. संदीप निबे,. गणेश.विकास वाघमारे दीपक कदम, सुनील बोरगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.