महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Cityline Media
0
महाबोधी महाविहार मुक्ती साठी
संगमनेर मध्ये एकवटणार बौद्ध समाज बांधव

संगमनेर /नितीनचंद्र भालेराव 
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार दि १८. मार्च २०२५ रोजी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील सर्व बौद्ध महाविहार,बोधगया,नागपूर दिक्षा भुमीसह सर्व लेणी ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या,बौद्ध समाजाच्या ताब्यात द्याव्यात तसेच बोधगया मंदिर अधिनियम कायदा १९४९ रद्द करण्यात यावा यासाठी संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार दि १८ मार्च रोजी सकाळी१० वा.संगमनेर प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सदरचे आंदोलन वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.या धरणे आंदोलना करिता भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम रणशूर,सुगंधराव इंगळे, विश्वास जमधडे,वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,अनिल जाधव यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 तरी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील बौद्ध बांधव उपासक,उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संगमनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष तथा बौद्धाचार्य रामदास भालेराव,एकनाथ मेढे,केंद्रीय शिक्षक अशोक गायकवाड,राजेंद्र मुन्तोंडे,बी एस मुन्तोडे,गौतम भालेराव,पि.एस.रोकडे,वाय एल मुन्तोडे,बाळासाहेब भालेराव,रावसाहेब पराड,वंचित बहुजन आघाडीचे अजिज‌ ओहरा,जेष्ठ नेते चंद्रकांत पवार ,वैभव मोकळ,अमोल शेळके,रविंद्र भालेराव,संदिप मोकळ,
बापू खरात,बाबासाहेब खरात, युवराज तपासे,बच्चन भालेराव,भिमराव कुदनर,सचिन भालेराव,गोरख जगताप,शिवाजी तळपे, अक्षय सरोदे,नितीन खरात, सचिन राऊत,गौतम पगारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा,समता सैनिक दल,वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी,युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन संगमनेर यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!