सह्याद्री ट्रेकर्स तर्फे श्रीरामपुरात शिवकालीन नाणे प्रदर्शन

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम ) लोकांना इतिहासाची जाणीव असली पाहिजे,कारण जो आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही अशी नेहमी इतिहासा बद्दल जाणीव असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स परिवाराने श्रीरामपूर येथे लोकमान्य टिळक वाचनालयात शिवकालीन शस्त्र व नाणे प्रदर्शन आयोजित केले.
या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र,दारू गोळा,जुनी नाणी,तलवारी हे प्रेक्षकांनी बघिल्यावर जुन्या काळच्या इतिहासातील लोक कसे असतील ते मावळे कसे असतील,महाराजांनी या सर्वांची बांधणी कशी केली असेल,शस्त्र चालवण्यासाठी त्यांनी कौशल्ये कसे आत्मसात केले असतील,असे अनेक प्रश्न हे प्रदर्शन बघताना लोकांच्या मनात निर्माण झाले प्रतिकूल परिस्थितीत संयम,त्याग,धैर्य,सामर्थ्य,यश यांची सांगड कशी घातली असेल.?कोणत्या ठिकाणी कोणती नीती वापरावी कोणत्या ठिकाणी कोणते शस्त्र वापरावे एवढा बारीक अभ्यास शिवकाळात महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केला,या सगळ्या गोष्टीची जाणीव हे प्रदर्शन बघताना झाली.
हे प्रदर्शन येथे आयोजित केल्याबद्दल सह्याद्री ट्रेकर्स परिवाराचे सर्व स्तरातून आणि इतिहास प्रेमीकडून कौतुक होत आहे.हा इतिहासाचा एक खजिना एक भाग जोपासणारे  येथील राजू अनवते आणि पवन त्यांच्या टीमचे विशेष कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!