सत्य घटना आहे आणि तुमच्या इथे घडत सुद्धा असेल.
१९९०, ते २००५ चा काळ
एका गावात एका घरात एक सुंदर मुलगीचा जन्म झाला होता,तिच्या आई वडिलांनी कष्ट करून तिला लहानाचे मोठे केले ,शिक्षण दिले, उच्च शिक्षण दिले तिच्या सर्व इच्छा पुर्ण केल्या ती मुलगी उच्च शिक्षित झाली, शिवाय स्वतः चे निर्णय स्वतः घेण्यात सक्षम झाली,घरातील वातावरण अगदी खिळीमिळीचं! ती धरून तिच्या आईवडीलांना अशा तीन मुली होत्या आणि एक भाऊ इतर ही बहिणी वागायला ,रहायला ,अभ्यासात ,शिक्षणात हुशार ही होत्या आणि सुंदर आणि साक्षर होत्या घरातील वातावरण दैववादी होते.आई वडीलांचे इतके शिक्षण झाले नव्हते.नेहमीच काही अंधश्रद्धा आणि दैववादी गोष्टी आई वडिलांच्या मनात होत्या. याची कारणे ही तशीच होती अस्पृश्य कुटुंबातील व्यक्ती अज्ञान आणि गुलामीच्या विळख्यात कशी होती ही काय सांगायची गोष्ट च नव्हती मग कोणी तरी येईल आणि आमच्या पाठीशी उभा राहील आमचा कर्ता धर्ता आता फक्त ईश्वर आहे कारण तोच आमचा रक्षणकर्ता आहे. याच त्या मानसिकतेत असलेली ती मंडळी..
ठिक आहे असे सगळी कडे वातावरण होते.अस्पृश्य ,दलित ,स्त्रिया या खूप प्रमाणात दैववादी ,नशीबवादी आणि जोतीषवादावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या आणि भिती ही होती कुलदैवत कोपेल, ग्रह ,नक्षत्र कोपेल अशा शुभ अशुभ आणि मुहूर्त ,जोतीषवादावर विश्वास ठेऊन जीवन जगत होते
आता महत्त्वाचे सांगायचे म्हणजे जी मुलगी सुंदर होती आणि जिचे आता लग्नाचे वय झाले होते तिला आता स्थळ येऊ लागली होती सुशिक्षित, गोरी आणि स्वभावाने चांगली असणाऱ्या मुलीला कोणीही पसंत करुन एका पायावर लग्न करायला तयार होतील असे त्या मुलीचे गुण होते
आता माशी कुठे शिंकली ?
लोकांना ठगणारे ,फसवणारे ,लबाडी करणारे ,जोतिषी तिची पत्रिका काढून त्यात तिला मंगळ आहे असे सांगु लागले मुलीला मंगळ आहे अशी बातमी इथून तिथे आणि तिथून इथे भावकीत ,पाहुण्यात अशी पसरली की जसे काय एखादी वाऱ्याची झुळूक इथून तिथे आणि तिथून इथं निघते ...
आता बघा एखाद्या जोतीषवादाच्या भितीने जोतिषी व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचं कर्म ,गुण ,वागणं ,राहणं ,शिक्षण सर्व Null and Void करुन म्हणजे शुन्यवत करून तुझी काहीच पात्रता नाही अशी समज तिच्या आणि तिच्या आई वडीलांच्या माथ्यावर मारली,
लोक तिला अपराध्यासारखं बघत होते ती आतून आणि मनातून खचली असेल तुटली असेल तिला असे वाटले असेल की आपले शिक्षण,आपले गुण काहीच कामाचे नाहीत .तिने मनात नकारात्मकता निर्माण केली असेल . आपलं कसं होणार !बघा हे सर्व जोतिषी ठगणाऱ्या भटजी ,ब्राह्मणामुळं झाले होते.याचा मुळ सुत्रधार ब्राह्मण जोतिषी होता.ज्याने त्यांच्या डोक्यात हा Wrong Number आणि खोटे गोष्टी,अंधश्रद्धा घातलेल्या होता.
या जोतिषी ने कश्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची पात्रता ठरवलेली होती बघा .आपले कर्म ,शिक्षण ,गुण सर्व निष्फळ ठरवले होते .
पुर्वी ज्योतीषी कसे ठगायचे? आणि आता सुद्धा ठगत आहेत हे एक चांगलंच उदाहरण आहे .
जोतीषीने सर्वात पहिल्यांदा याचे अज्ञान पसरवले एका कामात दुसऱ्यांदा स्वतः चा फायदा बघितला
खोटं नाटं पसरवून दिले अंधश्रद्धा पसरवली
शिवाय एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यात ही आला.
मित्रांनो मंगळ ग्रह हा आपल्या अवकाशातील आपल्या आकाशगंगेत सूर्य मालिकेत असलेला पृथ्वीपासून खूप लांब म्हणजे प्रकाशवर्षे लांब असलेला सुर्यमालेतील चौथा ग्रह आहे ,त्याला दोन चंद्र आहेत
त्याच्यावर जमीन तांबूस रंगाची जशी कोकणातील आहे.
लाखो किलोमीटर असलेला पृथ्वीच्या आकाराइतका असलेला मंगळ ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा त्याची पात्रता कशी ठरवू शकतो? .
तो ग्रह आहे त्याच्या वर डोंगर आहेत ,पर्वत आहेत ,दरी आहेत ,उल्कावर्षाव होऊन झालेले खड्डे आहेत ,ठिकठिकाणी कधी तिथे पाणी असेल असे तलाव आहेत ,सुकलेले ,वेगवेगळे मुलद्रव्ये आहेत. वायु आहेत मंगळ आपल्या पासून लाखोकिलोमीटर दुर लांब आहे
मग तो आपल्या जीवनात आपण वाईट किंवा चांगले कसे काय ठरवू शकतो?
एखाद्या निर्जीव ग्रहाला या गावात याठिकाणी ही व्यक्ती आहे असं कस समजू शकते ? शक्य आहे का ?
तर्क, चिकित्सा आणि विचार करण्याची गोष्ट आहे नाही का ?
मग ही फालतू समज डोक्यात घालून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्ती सरळ फासावर देण्याच्या पात्रतेच्या आहेत.
महात्मा फुले म्हणतात:-
विद्ये विना मती गेली |
मती विना गती गेली |
गती विना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले .
पत्रिकेत मंगळ आहे असे म्हणणाऱ्या चे मुस्काट फोडा आणि अशा चुकीच्या रुढी परंपरा बद्दल बहिष्कार घाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तर सर्वात जास्त लढाया तर अमावस्येला केल्या आणि गड किल्ले जिंकले आहेत
आपल्या मनगटाच्या जोरावर ,ज्ञानाच्या आधारे ,कष्टाने व्यक्ती कुठच्या कुठे पोहचू शकतो ...
नासा भरपूर पैसा खर्च करून मंगळ ग्रहावर मनुष्य पाठवणार आहे एलोन मस्क सध्या या तयारीत आहे
कुठल्या जमान्यात जगताय मित्रांनो व्यक्ती कर्माने ,गुणांनी ,ज्ञानाने ,विचारांनी श्रेष्ठ ठरतो ग्रह ,नक्षत्र किंवा जातीने ,वर्णाने श्रेष्ठ ठरत नाही आपण अमुल्य आहोत आपण एक स्वतः चे विश्व विश्व आहोत कधी स्वतः चा डोळा आरशात पहा एकदम जवळ जाऊन पहा किती तो सुंदर दिसत असतो विश्व बघा
सत्य शोधा,विचार करा ,अभ्यास करा आणि समान विचार इतरांना ही सांगा आणि प्रबोधन करा ....
सत्यशोधक महेश शिंदे
मो. 70578 01271
