हॉलीबॉल स्पर्धेत ए बी एस एस व मिलेनियम स्कूल चिंतामणी चषकचे मानकरी

Cityline Media
0
२२ संघांचा सहभाग,दोन दिवस स्पर्धा,आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन मुलींचा सन्मान

धनकवडी प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित साधून धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्या मंदिरच्या भव्य प्रांगणात ए बी एस फ स्पोर्ट क्लब व ऐश्वर्या स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात ए बी एस एफ तर मुलींच्या गटात मिलेनियम स्कूलने चिंतामणी चषक पटकावला.
स्पर्धेत मुलांमध्ये निमंत्रित १२ संघ व मुलीं मध्ये निमंत्रित १० संघां नी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रियदर्शिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री दिघे व रूपाली मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले,लिघ स्वरूपाच्या स्पर्धेत दोन दिवसांमध्ये ४८ सामने झाले झाले.

मुलांच्या गटात फुरसुंगी येथील शिवमुद्रा संघ व धनकवडीतील एबीएसएफ संघात अंतिम सामना झाला या सामन्यांमध्ये एबीएसएफ हा संघ २-० असा सरळ सेट मध्ये विजय मिळवला तर मुलींच्या संघामध्ये मिलेनियम संघाने २-० नी सामना जिंकला 
या स्पर्धेमध्ये वेदांत म्हमाणे, राजवीर भोसले तर मुलींमध्ये अकोला कोंडे, सिद्धी सनस, अमृता सिंग उत्कृष्ट खेळ करून वैयक्तिक पारितोषिक प्राप्त केले.

गौरव येरावार सर्वोत्तम खेळाडू तर मुलींमध्ये देवकी राऊत हिने सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला. 
आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले, सोबत अप्पा रेणूसे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते भाऊ मोरे, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष उदय कड, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सेंट्रल रेल्वे प्रशिक्षक अभय कुलकर्णी, इन्कमटॅक्स प्रशिक्षक अनुराग नाईक, प्रा. निलेश जगताप, विलास घोगरे, नगरसेवक युवराज रेणुसे, दिनेश जगताप, विलासराव भणगे,गौरव डेंगळे, मयूर संचेती उपस्थित होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण ए बी एस एफ क्लबचे मार्गदर्शक रुस्तम हिंद.महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे व  भारती विद्यापीठचे क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव यांचे हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी ए बी एस फ क्लबचे मार्गदर्शक डॉ संतोष पवार, मनोज तोडकर, संदीप भोसले, रोहित मालगावकर व ए बी एस एफ क्लब चे सर्व आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू यांनी नियोजन केले.


 जागतिक महिला दिनानिमित्त तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू सलोनी जाधव, श्रुती गोडसे, श्रेया बोरस्कर यांचा चिंतामणी ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष आप्पा रेणुसे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!