राहुरी (प्नतिनिधी) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांची निवड झाल्याबद्दल येथील राहुरी अर्बन मित्र मंडळाचे वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी राहुरी अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.प्रसंगी राहुरी अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे,डॉ.केमिस्ट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास पाटील,साई आदर्श मल्टीस्टेटचे संचालक किशोर थोरात,साई सेवा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप येवले,राहुरी येथील कडू मामा प्रसिद्ध आडत व्यापारी संस्थेचे बापूराव कडू, धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते,कानिफनाथ इंजीनियरिंगचे संचालक सोपानराव सौदागर आदि मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
