अत्याचार विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे अटकेची मागणी
नाशिक (दिनकर गायकवाड) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा येथील एक बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेच्या कोतुळ येथील नराधमाने अपहरण करून दोन महिन्यांपासून डांबुन ठेवले असल्याची जोरदार चर्चा आहे.येथील जिल्हाधिकाऱ्याकडे अत्याचार विरोधी कृती समितीने धाव घेतली असून आरोपीला तात्काळ अटक होऊन शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा र. नं. १/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.आरोपी शिवा परदेशी याने खारीचा पाडा येथील १७ वर्षीय अज्ञान बालिकेचे बळजबरीने अपहरण केले केले असून ते सध्या फरार आहे.
आरोपीने गेल्या २ महिन्यांपासून बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचे सर्वांगाने शोषण केले असल्याचे फिर्याद पिडीतेचे वडील नामदेव किसन चिखले यांनी हरसूल पोलिस ठाण्यात दिली आहे.वारंवार.
ठाण्यात चकरा,हेलपाटे मारूनही आरोपीला अटक झालेली नाही. यानंतर तक्रारदाराने पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामिण तसेच महिला सुरक्षा विभाग,नाशिक ग्रामिण पोलीस, सायबर सेल गुन्हे नाशिक ग्रामीण शाखेत तक्रार नोंदवली आहे,परंतु पोलिसांनी आरोपीच्या भावाबरोबर अर्थपूर्ण देवाण-घेवाणीतून आरोपीला मोकाट सोडलेले आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
हि बाब अतिशय गंभीर असून येथील अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने.जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.आरोपीला तात्काळ अटक करावी.आरोपीच्या विरोधात पोक्सो तसेच अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रोसिटी)अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केलेली आहे.अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
निवेदनावर समितीचे मुख्य निमंत्रक ॲड.राहूल विष्णू तूपलोंढे,डाॅ.भारत कार्ट्टाचा, ॲड. निलेश सोनवणे,ॲड बी. टी. देवरे,ॲड.तात्याराव जाधव,ॲड. कैलास चव्हाण,रोहिणी जाधव, अरविंद चव्हाण, महादू बरे, गणेश रणधीर,अशोक पगारे , मंगल भांगरे, काॅ. दशरथ वाघचौरे,आदींसह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
