ज्ञानमयी शुभवर्तमानी संदेष्ठा: भाऊसाहेब यादव

Cityline Media
0
बुद्धीवादाचे अधिष्ठान असलेल्या संस्कृतीचा वैश्विक पातळीवर प्रसार केला जावा,परंतु लोक मानसिक गुलामीत अडकवून पडू नये आणि शिक्षणाने सोशित वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील समाज मुख्य प्रवाहात येऊन त्यांचे भविष्य उज्वल ठरणार आहे हे मिशनऱ्यांनी प्रथम हेरले होते अणि याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अनेक शाळांची निर्मिती केली.
सावित्री ज्योतीने पुण्यात टाकलेल्या शैक्षणिक ठिणगीचा वणवा संपूर्ण भारतभर पसरला आदर्श शिक्षक कसा असावा याचा वस्तूपाठ घालून देणारे अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठरलेल्या

 संगमनेरच्या ज्ञानमाता शाळेतील शिक्षक भाऊसाहेब यादव 'ज्ञानमाता'शाळेने शैक्षणिक मुल्यांची उधळण करत संगमनेर तालुक्यात शैक्षणिक क्रांती केली याच शाळेत बहुजन समाजाची अनेक मुले शिकले,दर्जेदार शिक्षणासाठी ज्ञानमाता आजही गौरवाकिंत आहे तसेच याच अनेक जे मोजके शिक्षक होऊन गेले,आणि आजही जे तळमळ आणि पोटतिडकीने ज्ञानदान करतात त्यातील एक म्हणजे भाऊसाहेब यादव सर हे होय.

 परिस्थिती पुढे रडणारे आयुष्यात हरतात आणि परिस्थितीपुढे लढणारे स्वतःबरोबर इतरांच आयुष्य घडवतात.या विचाराला यादव सरांनी प्रत्यक्षात उतरवले.सरांचं गाव संगमनेर तालुक्यातील कौठे-कमळेश्वर.या गावात बाराही महिने दुष्काळ असतो,परंतु ते मात्र वास्तव जगायला शिकविते त्यामुळे खेडे गावे अनेकांचे प्रेरणास्त्रोत ठरतात.यादव सरांना याच शाळेने आधार दिला.

याच शाळेतील बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीला सुरवात केली.संयम आणि जिद्द या उपजत मिळालेल्या गुणांच्या भांडवलावर त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत संगमनेरातच शिक्षण शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला.शिक्षक म्हणून याच शाळेत रुजू झाले.' शिक्षक म्हणजे माणसाला निर्मिकाने दिलेला आशीर्वादच' हे वाक्य यादव सरांना तंतोतंत लागू झाले.निर्मिकाने विद्यार्थी घडविणारा शिक्षक कसा असावा याची प्रेरणा इतरांना देण्यासाठीच सरांना जणू भुतालावर पाठवले.

सर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबर जगाचे पुस्तकही शिकवतात.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर जोडताना गावकरी,पालकांना शाळेशी कसं जोडावं याची कला फक्त यादव सरांकडून शिकावी.शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी स्वतःमधील संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता कधीच मरू दिला नाही.

सरांचा मात्र त्यांच्या सत्कर्मावरील विश्वास कधीच ढळत.नाही,जितके प्रामाणिकपणे काम केले तितकेच त्यांना मानसिक समाधान मिळते.शिक्षकांनी ज्ञान मिळवण्यासाठी सतत चौकस राहीले पाहिजे.अशी त्यांची भावना आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आवर्जून दिली पाहिजे.आम्ही तत्व,विचारामुळे घडलो.तुम्हीही याच गोष्टींची साधना करा.तुम्ही घडले तर विद्यार्थी घडतील.हे बरोबरच्या सहशिक्षकांना ते आवर्जून सांगतात.आज सरांचा वाढदिवस त्यानिमित्ताने..

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की काळ पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

w.w.w.citylinews.in
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!