समविचारी संघटनांबरोबर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव)
संगमनेर येथे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना
मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात निवेदन देण्यास गेलेल्या छात्र भारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर तसेच पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली.तसेच राज्यभरात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटना,लोकशाही पद्धतीने न्याय मागत असताना होणारी मुस्कटदाबी,नेत्यांची-मंत्र्यांची बेभान वक्तव्य,समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहे.तसेच संगमनेर येथील मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ येथील प्रांत कार्यालयावर समविचारी पुरोगामी संघटनांसह वंचित बहुजन आघाडीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
यावेळी मा.आ.कपिल पाटील,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले,वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते,सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर हे मोर्चात प्रमुख उपस्थितीत होते संगमनेर प्रांत कार्यालयावर समविचारी पुरोगामी संघटनांच्या वतीने काढलेला निषेध मोर्चा भव्य होता.
यावेळी पोलीस उपाधीक्षक सोनवणे यांना निवेदन देऊन आरोपींवर सक्त कार्यवाही व्हावी यासाठी आग्रह धरण्यात आला.निषेध सभेसाठी
प्रसंगी.कपिल पाटील,.डॉ.सुधीर तांबे,सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले,वंचितच्या राज्य प्रवक्ता प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते,सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजा कांदळकर,छात्र भारतीचे राज्याचे अध्यक्ष.रोहित ढाले,राजा अवसक,ॲड.रंजनाताई गवांदे, सिताराम राऊत,डॉ.सागर भालेराव,दत्ता ढगे,रजत अवसक यांच्या सह छात्रभारती संघटनेचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
