संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील जुन्या पिढीतील दगडू कृष्णा मुंडे (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सहा मुली नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने खळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.दगडू मुंडे हे येथील भोलेनाथ सहकारी दूध व्यवसाय संस्थेचे कर्मचारी बबन दगडू मुंडे यांचे ते वडील होत.