छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे नितेश राणे यांना जाहीर आव्हान
नाशिक (दिनकर गायकवाड)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत अठरा पगड जातीचे आणि मुस्लिम धर्मीय सुद्धा इमाने इतबारे स्वराज्याची शपथ घेऊन छत्रपतींच्या फौजेत दाखल झाले होते त्यांनी कधीही छत्रपती शिवरायांशी गद्दारी केल्याचा उल्लेख इतिहासात दिसून येत नाही परंतु दिवसेंदिवस नेहमी बेताल वक्तव्य करून आणि हिंदूत्वाची खोटी झुल पाघंरुन मुस्लिमांबद्दल द्वेष पसरविणारे मंत्री आमदार नितेश राणे यांनी नुकत्याच केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध येथील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण यांनी केला.
पुढे बोलताना अजीज पठाण म्हणाले की मुस्लिम समाजाचे नूरखान, सिद्धी हीलाल, रुस्तुमे जमान,दरिया सारंग,काजी हैदर,मीर मोहम्मद,मदारी मेहतर यासारखे असंख्य इस्लाम धर्माला मानणारे वफादार मुस्लिम सैनिक छत्रपती शिवरायांच्या सैन्यात होते.आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी कधी आपल्या जीवाची परवा केलेली नाही तसेच कधीही शिवरायांशी आणि स्वराज्याशी गद्दारी केलेली नाही,परंतु नितेश राणे यांनी स्वतःमध्ये झाकून पाहावा की सत्तेसाठी लाचार होऊन आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या पक्षाशी गद्दारी करून आज मंत्रीपदावर बसला आहात.
खऱ्या अर्थाने या स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या अठरापगड जातीत आणि मुस्लिम समाजाने बलिदान दिलेले आहे याचा इतिहास आजही इतिहासात उपलब्ध आहे त्यांनी पहिले निरीक्षण करावे व त्यानंतर स्वतःच आत्मपरीक्षण करावे का?आपण कोणकोणत्या पक्षाशी गद्दारी केलेली आहे अशा गद्दारांनी मुस्लिम समाजावर आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची तोड मोड करून सादर करण्याचा प्रयत्न करू नये.
छत्रपती शिवराय हे सर्व धर्म समभाव मानणारे होते त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी सर्व धर्मीय सर्व जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलेले होते.
अशा महान छत्रपती शिवरायांना कमी दाखवण्याचा प्रयत्न नितेश राणे सारख्या दल बदलू पक्ष बदलू ने करू नये.त्यांना आमचे खुले आव्हान आहे की समोरासमोर स्टेज लावून इतिहास दाखवून द्यावा नाहीतर आम्ही इतिहासाचं विश्लेषण करून त्यांना सत्य इतिहास दाखवू की छत्रपती शिवरायांच्या फौजेत अठरा पगड जाती व मुस्लिम धर्मीय किती होते.
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जातीव्यवस्था बिघडवण्याचा धर्माधर्मात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आवाहन करीत आहे की अशा प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करणारे मंत्री आपल्या मंत्रिमंडळात न ठेवता त्यांची तात्काळ हकलपट्टी करावी.
संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य गणले जाते अशा राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे मंत्री आपण मंत्रिमंडळात कसे ठेवतात गृह खातही आपल्याकडे असून नितेश राणे यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आवाहन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण यांनी केले.
