फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा ४२ वा वर्धापन उत्साहात

Cityline Media
0

श्रीरामपूर-(दिपक कदम) येथील फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्च आ दर्शनगर श्रीरामपूर या चर्चचा ४२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर चर्च महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कौन्सिल ऑफ साऊथ इंडिया असेंम्बलीज ऑफ गॉड र.न.२७०१ ह्या संस्थेच्या वतीने चालविण्यात येते.या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून संस्थेचे खजिनदार रेव्ह याकोब वडगळे हे होते,

त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञाप्रमाणे जीवन जगले पाहिजे आपले वर्तन हे येशू ने सांगितले प्रमाणेअसावे एकमेकांवर प्रेम करावे रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करावी येशू ख्रिस्ताची शिकवण अमलात आणावी.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.विजय केदारी यांनी केले.यावेळी श्रीरामपूर न.प.चे माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी, राष्ट्वादी काँग्रेसचे लकी सेठी ,ख्रिस्ती विकास परिषदेचे दीपक कदम,अविनाश काळे,श्रीरामपूर तालुका ऑल पास्टर्स फिलॉशिपचे अध्यक्ष रेव्ह राजेश कर्डक ,आर.पी.आय.महिला अध्यक्ष रणदेवी धिवर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले,

या कार्यक्रमात महाराष्ट्र डिस्ट्रिक्टचे सदस्य रेव्ह दत्ता अमोलिक,प्रिसबीटर रेव्ह योसेफ वडागळे,शहरातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू,व भावीक मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस कांबळे यांनी जेल तर आभार प्रदर्शन विश्वरंजन मकासरे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!