अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेतर्फे नुतन रेकॉर्डिंग स्टुडिओची निर्मिती
श्रीरामपूर (दिपक कदम) दिव्यांगांना प्रेरणादायी वाटेल अशी यशोगाथा खोकरचे अंध गायक विकास साळवे यांची आहे असे प्रतिपादन भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनात्मक प्रकल्पांतर्गत दिव्यांगांसाठी हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी गायक विकास साळवे यांच्या सिद्धिविनायक रेकॉर्डिंग स्टुडिओची निर्मिती करून दिव्यांगांसाठी विकासाची गुढी निर्माण केली आहे.
खोकर सारख्या ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण करून दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाला चालना देण्यात आली आहे.संजय साळवे यांनी विकास साळवे यांना मार्गदर्शन केले असून.या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकार आपले स्वर या रेकॉर्डिंगशी नक्कीच जुळवून घेतील.असे नितीन दिनकर म्हणाले
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे,आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताक तांबोळी, भीमशक्ती संघटनाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव , जे.डी महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका किरण जाधव अस्मिता मातंग संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे पत्रकार राजेंद्र देसाई,बाबासाहेब पठारे,सुदाम काटकर सौ.संगीता साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक.संजय साळवे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताक तांबोळी यांनी केले.आभार अण्णासाहेब साळवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत लोंढे, विशाल गायकवाड,रशीद शेख, सुभेदार रन्नवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.