श्रीरामपूर शहर आणि ग्रामीण भागातील ख्रिस्ती भाविकांसाठी क्रृसाच्या वाटेची भक्ती

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम) शहरातील व धर्मग्रामातील सर्व खिस्ती भाविकासाठी क्रुसाच्या वाटेची भक्ती आराधना नुकतीच आयोजित केली होती.
पवित्र क्रुसाची वाटेची भक्ती सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ६ः३० वाजता लोयोला सदन श्रीरामपूर या ठिकाणाहून निघाली होती. भाविकाच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती.पवित्र क्रुसाची वाट ही श्रीरामपूर येथील लोयोला सदन येथून सकाळी ६:३० वाजता प्रारंभ झाली व शेवट डि पाॅल इंग्लिश मेडीयम स्कूल राहूरी फॅक्टरी करण्यात आला.

क्रुसाची वाट चालत असताना - क्रुसा विना  वाट चालतो आहे..!! ती वाट धन्य झाली तुझ्या पदस्पर्शाने,त्या वाटेतील दगड गोटे बोलके झाले तुझ्या पाऊलखूणानी , ते खाच खळगे भरून निघाले तुझ्या रक्ताने ,मी मित्र अजूनही त्या वाटेच्या शोधात आहे.

याप्रमाणे क्रुसाच्या वाटेची भक्ती ही पहिले स्थान लोयोला सदन चर्च श्रीरामपूर येथे प्रकाश भालेराव,दुसरे स्थान आशाकुर महिला सदन भोकर येथे सिस्टर प्रिसिलला, तिसरे स्थान ज्ञानमाऊली मंदिर नेवासा येथे फा.दिलीप जाधव,चौथे स्थान सेंट मेरी स्कूल नेवासा फाटा,पाचवे स्थान भक्ती निवास चर्च पाथर्डी येथे फा.के.के. जोशी,सहावे स्थान सिस्टर ऑफ आरोग्य माता पाथर्डी सिस्टर लुसिया, सातवे स्थान नित्यसेवा हॉस्पीटल शेवगाव येथे सिस्टर तेरेजा रुपटक्के,सि.मनिषा कोल्हे,सि.सुनंदा चित्ते,सि.जुली डिसोझा,आठवे स्थान होली स्पिरीट चर्च शेवगाव येथे फा.सुभाष त्रिभुवन व फा.आबा, नववे स्थान ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव येथे अब्राहम रणनवरे, दहावे स्थान स्पिरीट ऑफ सेंट अंनिज घोडेगाव येथे सिस्टर मेरी दिब्रिटा,अकरावे स्थान होली स्पिरीट चर्च सोनई,बारावे स्थान संत जोसेफ चर्च वळण,तेरावे स्थान स्नेह सदन चर्च राहूरी येथे फा.राजू शेळके,चौदावे  स्थान जिजस् ॲण्ड मेरी कॉन्वेहेट येथे तारा ओहोळ,पंधरावे स्थान फातिमा माता चर्च राहुरी फॅक्टरी,सोळावे स्थान डी पॉल स्कूल राहूरी फॅक्टरी येथे फा.सेंटो या सर्व धर्मगुरु व सिस्टरर्स सर्वांनी उत्कृष्टपणे नियोजन व आयोजन केले होते.

हि भक्ती लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,डी पाॅल व्यवस्थापक रे.फा. फ्रॅन्को, संत विन्सेंट चर्च आगाशेनगर यांनी आयोजित केली होती. व त्यांच्या सेवेसाठी रे.फा. सिजो, रविंद्र लोंढे, दिपक कदम, अन्तोन साळवे व संदिप मारके यांनी सहकार्य केले.तसेच असंख्य भाविकांनी सहभागी होवून उपवास काळातील आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पुर्ण करण्यासाठी प्रार्थनेत सहभागी झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!