हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केला बिरदेव ढोणे यांचा सत्कार

Cityline Media
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे यशाचे शिखर गाठले - बिरदेव ढोणे 

संगमनेर (नितीनचंद्र भालेराव) कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.यूपीएससी२०२४ च्या परीक्षेत त्यांनी ५५१ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले.विशेष म्हणजे,तो आपल्या तालुक्यातील पहिला आयपीएस  अधिकारी असून एका मेंढपाळ कुटुंबातील आहे.कठोर मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही शिखर गाठता येते,हे बिरदेव ढोणे याने दाखवून दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी अशा कर्तृत्ववान बिरदेव ढोणे यांच्या गावी जाऊन सत्कार केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना (शिंदे)मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव,भाजपा कार्यकर्ते केशव दवंगे,सोमनाथ दवंगे यांच्या सह इतर कार्यकर्त्यांनी यमगे या गावी जाऊन बिरदेव ढोणे यांची भेट घेऊन सत्कार केला.हिवरगाव पावसा येथील कार्यकर्त्यांनी  विधान परिषदेचे उपसभापती प्रा.राम शिंदे यांच्याबरोबर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला.उपसभापती प्रा.राम शिंदे यांनी बिरदेव ढोणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मेहनत व जिद्दीने संघर्षाबद्दल कौतुक केले.

हजारो किलोमीटर दूर हिवरगाव पावसा येथून येऊन सत्कार केला,त्या सत्काराने बिरदेव ढोणे भारावले.हिवरगाव पावसा ग्रामस्थान बरोबर चर्चा करताना बिरदेव म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणामुळे खडतर परिस्थितीवर मात करून मी हे यश संपादन केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे,तुम्ही गरिबीत जन्मला,हा तुमचा दोष नाही.पण गरिबीत मेलात,हा तुमचा दोष आहे. प्रयत्नांची पराकष्ठा केली, तर संधीचे सोने करून यश प्राप्त करू शकतात.

 माझ्यासारखा मेंढपाळाचा मुलगा करू शकतो,तर तुम्हीही करू शकतात.गावाकडच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता,आपले प्रयत्न आणि चिकाटी ठेवली तर सगळ्या गोष्टी साध्य करणे सोपे आहे,असा संदेश बिरदेव याने तरुणांना दिला.बिरदेव ढोणे यांनी सांगितले की मान्यवरांनी बुके देऊन सत्कार करण्यापेक्षा पुस्तक द्यावीत.ते पुस्तके स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील असे अपेक्षा व्यक्त केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!