महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य मिरवणूक
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे महामानव भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची संयुक्त साजरी करण्यात आली.सकाळी नऊ वाजता कॅनरा बँक चौकात महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करून अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी सरपंच सुभाष गडाख राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, शिवसेना शिंदे मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे,कैलास दिवटे,मन्सूर इनामदार,समता सैनिक बच्चन भालेराव,विकास दारोळे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात सामूहिक बुद्ध वंदना व अभिवादन सभा उत्साहात पार पडले भीमशक्ती तरुण मित्र मंडळ व संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता भव्य पारंपारिक सवाद्य मिरवणूक मोठ्या उत्साहात जल्लोषात झाली.सदर मिरवणुकीमध्ये सर्व धर्मीय समाज बांधव सहभागी झाले होते.महिला,पुरुष,अबाल वृद्ध, तरुणांचा मोठा सहभाग मिरवणुकीत दिसून आला. मिरवणूक शांततेत आनंदात पार पडली मिरवणुकीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीनंतर बुद्ध विहारांमध्ये सामूहिक बुद्ध वंदना बौद्धाचार्य गौतम भालेराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महामानवास मानवंदना दिले.उत्कृष्टरित्या भीम गीतावर नृत्य आणि महापुरुषांच्या जीवनावर भाषणे सादर करून उपस्थिताचे मने जिंकली.बालसंस्कार केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मिलिंद भालेराव,चंद्रकांत भालेराव,राहुल भालेराव,सुयोग भालेराव,नितीन भालेराव,अशोक भालेराव,संतोष भालेराव,बाबाजी भालेराव,दत्तू भालेराव,संदिप भालेराव,संजय भालेराव,भाऊसाहेब भालेराव,
धनंजय भालेराव,प्रल्हाद मोकळ, उत्तम गायकवाड,सोनू भालेराव,राजेंद्र भालेराव,बाबासाहेब भालेराव,गौतम भालेराव, बाळासाहेब भालेराव,भीमराज भालेराव,सोमनाथ भालेराव,लहानू भालेराव,चंद्रकांत संसारे,सागर भालेराव,गुलाब भालेराव,महेंद्र भालेराव,
मधुकर भालेराव,धनंजय वाघमारे,दिपक भालेराव,राजु भालेराव,शरद भालेराव,यश भालेराव,निलेश भालेराव,शंकर भालेराव,बाबाजी भालेराव,हरिश्चंद्र भालेराव,सचिन भालेराव,शैनेश्वर भालेराव समाधान भालेराव,दिनकर भालेराव,रायभान भालेराव, यादव भालेराव,निलेश भालेराव,रवींद्र दारोळे,राजेंद्र दारोळे,रमेश दारोळे,संदेश भालेराव यांच्या सह भिमशक्ती तरुण मित्र मंडळ व संयुक्त जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते,बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.
